Teen Adkun Sitaram Esakal
मनोरंजन

Teen Adkun Sitaram: प्राजक्ता अन् वैभवचा लिपलॉक अन् कोणी कोणाला केलंय ब्लॉक?

Vaishali Patil

Teen Adkun Sitaram Movie: मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या आगामी सिनेमा तीन अडकून सीताराममुळे चर्चेत आहे. तिच्या या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

प्राजक्ता माळीसोबत या चित्रपटात वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे अशा कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर आणि त्यानंतर ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे.

आता प्राजक्ताने पुन्हा एकदा या चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यात प्राजक्ता आणि वैभव हे रोमँटिक अंदाजात दिसत आहे. मात्र त्याच्या प्रेमात वादाची ठिणगी पडली असल्याचं व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "कोणी कोणाला केलंय ब्लॉक? उद्या होणार हा गुंता अनलॉक! ‘तीन अडकून सीताराम’ उद्यापासून चित्रपटगृहात..!"

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा सिनेमा उद्या म्हणजेच २९ सष्टेंबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिझरमध्ये वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे यांसोबतच आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Latest Marathi News Live Update : ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष पेटवून सत्तेची खुर्ची मजबूत करण्याचा सरकारचा डाव; वडेट्टीवारांचा आरोप

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात २१ दिवसांत ८६० गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

SCROLL FOR NEXT