tejashree pradhan Instagram
मनोरंजन

'कशा असतात या बायका'; तेजश्री प्रधान का असं म्हणतेय? | Tejashree Pradhan

पहा तेजश्रीचा हा व्हिडीओ

स्वाती वेमूल

अभिनेत्री तेजश्री प्रधानने Tejashree Pradhan 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत शुभ्राची भूमिका साकारत चाहत्यांची मनं जिंकली. या मालिकेनंतर काही काळ तिने ब्रेक घेतला आणि आता ती पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. घर-संसार आणि नोकरी अशी कसरत करणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर आधारित 'कशा असतात या बायका' हा तिचा लघुपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या लघुपटात तेजश्री आणि अभिजीत खांडकेकर ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकत्र पहायला मिळत आहे. तेजश्री, अभिजीतसोबतच 'कोटा फॅक्टरी' फेम मयुर मोरे यानेही भूमिका साकारली आहे. 'कॉटन किंग' प्रस्तुत या लघुपटाची कथा महिलांच्या मनाला स्पर्श करणारी आहे.

'कशा असतात या बायका' हा लघुपट फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर पहायला मिळणार आहे. या लघुपटाचं दिग्दर्शन वैभव पंडित आणि लेखन मोनिका धारणकर यांनी केलं आहे. "दिवाळीच्या निमित्ताने विशेषकरून महिलांच्या भावनांना अधोरेखित करणारा हा लघुपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. कुटुंब आणि करिअर अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिलांना हा लघुपट समर्पित आहे", असं वैभव पंडित म्हणाले.

'भावा बहिणीच्या नात्यातले नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी.. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीची सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट,' असं कॅप्शन देत तेजश्रीने लघुपटाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या लघुपटात जरी भाऊबीजेची गोष्ट दाखवली असली तरी ही कथा केवळ बहिणीबद्दल नसून समाजातील बहुतांश महिलांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT