tejaswini pandit 
मनोरंजन

"मराठी अभिनेत्री बोल्ड फोटो शेअर करू शकत नाही का?"; तेजस्विनी पंडितचा सवाल

स्वाती वेमूल

सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातली दरी कमी झाली असली तरी अनेकदा सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. या ट्रोलिंगविरोधात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली होती. 'सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात होणारं ट्रोलिंग थांबवा. समोरचा व्यक्ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्या गोष्टींचा सामना करतोय, तो समस्यांना सामोरं जातोय हे कोणालाच माहित नसतं. पण तुमच्या नकारात्मक कमेंट्समुळे एखाद्याच्या मनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो', असं तिने लिहिलं होतं. त्यानंतर आता ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याच विषयावर मोकळेपणाने व्यक्त झाली आहे. मराठी अभिनेत्रींना त्यांच्या पोशाखावरून फार ट्रोल केलं जातं. पण मराठी अभिनेत्री बोल्ड फोटो शेअर करू शकत नाही का, असा सवाल तिने ट्रोलर्सना केला. 

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी म्हणाली, "विशेषकरून मराठी अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून खूप ट्रोल केलं जातं. हे खूपच अपमानकारक आहे आणि त्या गोष्टींच्या पूर्णपणे विरोधात आहे. जर तुम्ही काही चांगलं बोलू शकत नाही तर त्यापेक्षा तुम्ही काहीच बोलू नका. एखादा व्यक्ती त्याच्या खासगी आयुष्यात कोणत्या गोष्टींना सामोरं जात असेल हे आपल्याला काय माहित? मला एक गोष्ट कळत नाही की मराठी अभिनेत्रींनी बोल्ड फोटो शेअर केलं तर काय चुकलं? मराठी अभिनेत्री बोल्ड फोटो शेअर करू शकत नाही का? बॉलिवूड अभिनेत्री कोणत्याही प्रकारचे फोटो पोस्ट केले तर हेच ट्रोलर्स त्यांचं कौतुक करत असतात. आम्हीसुद्धा अभिनेत्री आहोत आणि आमचंसुद्धा काम सारखंच आहे. आम्ही तेच करत आहोत तर आमचं काय चुकलं?"

"मी पडद्यावर कोणतीही भूमिका साकारू शकते. मग ती आई असो, वेश्या असो, मोलकरीण असो किंवा आणखी काही. पण पडद्यामागे मी तशीच आहे असा अर्थ होत नाही. लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि सोशल मीडिया पोस्टवरून सेलिब्रिटींवर विशिष्ट गोष्टींचा ठपका ठेवणं बंद केलं पाहिजे. मी कोणाला थांबवू शकत नाही. पण माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा उपाय आहे आणि अनेकदा मी तेच करते", असंही ती पुढे म्हणाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT