Shrenu Parikh Wedding: Esakal
मनोरंजन

Shrenu Parikh Wedding: इश्कबाज फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

अभिनेत्री श्रेनू पारीख लग्न बंधनात अडकली आहे.

Vaishali Patil

Shrenu Parikh and Akshay Mhatre's wedding: टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारीख लग्न बंधनात अडकली आहे. तिने तिचा प्रियकर अक्षय म्हात्रेसोबत लग्न केले आहे.

श्रेनू पारीख आणि अक्षय म्हात्रेने गुरुवारी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. श्रेनूच्या मूळ गावी वडोदरा येथे हा भव्य विवाहसोहळा पार पडला.

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत कपल एकदम रॉयल आणि क्लासी दिसत आहे. तीन दिवसांच्या प्री-वेडिंग इव्हेंटनंतर श्रेनू अन् अक्षयचा लग्न सोहळा पार पडला. या जोडप्यांवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर श्रेनू पारीख आणि अक्षय म्हात्रेने लग्नाचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोत श्रेनू मरून आणि ऑरेंज सिक्वेन्स लेहेंग्यात सुंदर दिसत आह. तिने पारंपारिक दागिन्यांसह हा लुक पूर्ण केला होता. तर अक्षयने किरमिजी रंगाची शेरवानी परिधान केली होती आणि पांढऱ्या पगडीसह त्याला रॉयल टच दिला होता.

श्रेनूने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'एकत्र कायमचे.' यासोबतच त्यांनी लग्नाची तारीख 21 डिसेंबर 2023 सांगितली. श्रेनू आणि अक्षयच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्याचे फोटोही त्यांनी शेयर केले आहेत. या जोडप्याने वडोदरा येथे जवळचे मित्र आणि कुटुंबासह एक पार्टी आयोजित केली होती.

श्रेनू पारीख ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रेनूने 'एक भरम सर्वगुण संपन', 'इस प्यार को क्या नाम दूं - एक बार फिर', 'इश्कबाज', 'घर एक मंदिर' आणि 'जिंदगी का हर रंग...गुलाल' सारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये तिने काम केले आहे. तर तिचा पती अक्षय म्हात्रेने 'पिया अलबेला' आणि 'इंडियावाली माँ' मालिकेत काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT