Actor Vijay enters politics, announces the name of his party esakal
मनोरंजन

Thalapathy Vijay Political Party : साऊथच्या 'थलापती विजय'कडून राजकीय पक्षाची घोषणा! 'तमिळगा वेत्री काझम' पक्षातून मांडणार भूमिका

South's 'Thalapathy Vijay' announced a political party! साऊथचा प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathys Vijay) हा सध्या त्याच्या राजकीय पक्ष आणि राजकीय प्रवेश याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

युगंधर ताजणे

Vijay enters politics, announces the name of his party: साऊथचा प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathys Vijay) हा सध्या त्याच्या राजकीय पक्ष आणि राजकीय प्रवेश याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयच्या राजकीय पक्षाबाबत (South Actor Thapathy Vijay Latest News) वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अखेर विजयनं त्याच्या राजकीय पक्षाचे नाव जाहीर करुन मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्यांचे राजकारणात येणं आणि भूमिका मांडणे हे काही नवीन नाही. यापूर्वी कित्येक (Vijay Political Party) बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी राजकीय पक्षातून आपली भूमिका मांडली आहे. याला साऊथचे कलाकारही अपवाद नाहीत. त्यांच्याकडे तर कलाकारांची राजकीय कारकीर्द भली मोठी असल्याचे दिसून आले आहे. अशात आणखी एका प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्यानं त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा करुन चाहत्यांना धक्का दिला आहे.

एएनआयनं एक्स वर पोस्ट करुन थलापती विजयच्या राजकीय पक्षाविषयी माहिती दिली आहे. त्या पोस्टनुसार विजयच्या राजकीय पक्षाचे नाव तमिळगा वेत्री काझीम (Tamilaga Vetri Kazham) असे असणार आहे. या पक्षाच्या माध्यमातून विजय राजकारणातून सर्वसामान्य लोकांची भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या राजकीय प्रवेश आणि पक्ष याबाबत चर्चा सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT