tharla tar mag serial jui gadkari shared her and narayan jadhav off screen bonding  sakal
मनोरंजन

Jui Gadkari: पडद्यामागेही नातं बापलेकीचं.. अभिनेत्री जुई गडकरीने सांगितली खास आठवण..

स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली आणि मधुभाऊंचं खरं नातं..

नीलेश अडसूळ

jui gadkari new serial tharla tar mag: नुकत्याच सुरू झालेल्या स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून सायलीचा ज्यांनी संभाळ केला त्या मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायलीचे प्रयत्न सुरु आहेत. मधुभाऊ सायलीचे खरे बाबा नसले तरी लहानपणापासून त्यांनी सायलीला वडिलांच्या मायेने वाढवलं. बाप-लेकीचा हा अनोखा बंध मालिकेत पहायला मिळतो, तो पडद्यामागेही तसाच आहे. याच विषयी जुईने खास आठवण सांगितली आहे..

(tharla tar mag serial jui gadkari shared her and narayan jadhav off screen bonding )

पडद्यावर जसे त्यांचे बाप लेकीचे नाते आहे तसेच, खऱ्या आयुष्यातही आहे. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि मधुभाऊ म्हणजेच नारायण जाधव. ते खरे बाप लेक नसले तरी त्यांनी स्टार प्रवाहच्या 'पुढचं पाऊल'मध्येही एकत्र काम केलंय. पुढचं पाऊल मध्ये नारायण जाधव यांनी जुईच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. पुढचं पाऊल मालिका जरी संपली तरी जुई आणि नारायण जाधव एकमेकांच्या संपर्कात होते. 

या अनोख्या बंधाविषयी सांगताना जुई म्हणाली, ‘पुढचं पाऊलला नारायण मामांनी माझ्या आजे सासऱ्यांची भूमिका साकारली होती. तेव्हापासून त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची माझी इच्छा होती. मालिका संपली तरी आम्ही इतकी वर्ष संपर्कात होतो. नारायण मामा माझं काम आवडलं तर, पोस्ट आवडली तर स्वतःहून मला मेसेज, फोन करायचे.'

हेही वाचा: दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

पुढे ती म्हणाली, 'जुलै २०२२ मध्ये जेव्हा माझं ठरलं तर मग मालिकेसाठी कास्टिंग झालं तेव्हा मला कळलं की, मामा माझ्या वडिलांची भूमिका करणारेत हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. मला त्यांच्यासोबत काम करायला नेहेमीच मज्जा येते. त्यांच्या बद्दल एक आपुलकी वाटते. त्यांनी चित्रीकरणा दरम्यान “साऊ” अशी हाक मारली की खूप छान वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Pune Highway CCTV: अष्टविनायक महामार्गावरील शिंगवे फाट्यावर चार उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही; वाहतूक नियंत्रण व गुन्हे प्रतिबंधाला चालना

जमिनीतून गूढ आवाज अन् भूकंपाचे धक्के; नागरिकांनी थेट घराबाहेर घेतली धाव, हिंगोलीतील प्रकार

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

SCROLL FOR NEXT