Pallavi Joshi: धक्कादायक! काश्मीर फाईल्स फेम पल्लवी जोशींचा अपघात SAKAL
मनोरंजन

Pallavi Joshi: धक्कादायक! काश्मीर फाईल्स फेम पल्लवी जोशींचा अपघात

शूटिंगदरम्यान गाडीचा ताबा सुटला आणि त्या गाडीने पल्लवी यांना धडक दिली.

Devendra Jadhav

काश्मीर फाईल्स फेम मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशिंचा अपघात झालाय. पल्लवी सध्या विवेक अग्निहोत्री यांचा आगामी सिनेमा द वॅक्सीन वॉर सिनेमाचं शूटिंग हैद्राबाद मध्ये करत आहेत. शूटिंगदरम्यान गाडीचा ताबा सुटला आणि त्या गाडीने पल्लवी यांना धडक दिली. पल्लवी जोशी यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

द वॅक्सीन वॉर सिनेमाचं शूटिंग हैद्राबादला सूरु आहे. पल्लवी या सिनेमात महत्वाची भूमिका साकारत आहेत. शूटिंगदरम्यान हा अपघात झाला आणि पल्लवी जखमी झाल्या. पण तरीही पल्लवी यांनी शूटिंगमध्ये कोणताही खंड पडू दिला नाही. पल्लवी यांनी शूटिंग पूर्ण केले आणि त्यांना तातडीने हैद्राबाद मधील स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

द काश्मीर फाईल्स मध्ये पल्लवी जोशींनी साकारलेल्या भूमिकेची खूप चर्चा झाली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. २०२२ मधला सर्वाधिक चर्चेतला सिनेमा म्हणून या सिनेमाची ओळख आहे. पल्लवी जोशी सध्या द वॅक्सीन वॉर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सिनेमाच्या सेटवर अपघात झाल्याने उपचार घेऊन पल्लवी पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात करतील.

'द व्हॅक्सिन वॉर'च्या हा सिनेमा भारतीय शास्त्रज्ञांसह त्या लोकांवर आधारित आहे ज्यांनी जगातील सर्वात प्रभावी लस तयार करण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ रात्रंदिवस मेहनतीने काम केले. 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये जागतिक उत्पादकांच्या दबावाला तोंड देऊन आपल्या देशवासीयांचे प्राण वाचवण्यासाठी रात्रंदिवस मेहनतीने काम केलेल्या भारतीय शास्त्रज्ञांची कथा पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

Shivaji University GeM Purchase: प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल जीईएम खरेदी व्यवहारांची तपासणी सुरू; अंतर्गत लेखापरीक्षक करणार मार्गदर्शक सूचना

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT