three actors arrested by mumbai police for shooting adult content SAKAL
मनोरंजन

मुंबईत सुरु होतं लाईव्ह अश्लील व्हिडीओ शूट, अभिनेत्रींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अंधेरी वर्सोवा येथे ही घटना घडली आहे

Devendra Jadhav

महिलांचे अश्लील व्हिडीओ लाईव्ह स्ट्रीम केल्याप्रकरणी तीन कलाकारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी पिहू नावाच्या अॅपवरुन हे कलाकार अश्लील व्हिडीओचं लाईव्ह स्ट्रिमींग करत होते.

या प्रकरणी पोलिसांनी २० आणि ३४ वर्षीय अभिनेत्री आणि २७ वर्षीय अभिनेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघे या अॅपमध्ये अश्लील व्हिडीओ अपलोड करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अॅपवर गेल्या काही दिवसात अनेक अश्लील व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. अंधेरी वेस्टमधील भागात हा प्रकार उघडकीस आला. ही माहिती मिळताच आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिस संधीची वाट बघत होते. (Latest Entertainment News)

अखेर अंधेरी वेस्ट येथील चार बंगला येथे रविवारी अश्लिल व्हिडीओंची स्ट्रीमिंग होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढे पोलिसांनी रेड मारल्यावर तिघांना अटक करण्यात आली. हे तिघे व्हिडीओमधील कलाकार असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. आता पोलीस पिहू अॅपच्या मालकांच्या शोधात आहेत. (Latest Marathi News)

अटक करण्यात आलेल्या तिघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 292 (अश्लील सामग्रीची विक्री किंवा सार्वजनिक वितरण), 293 (वीस वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला अश्लील सामग्री विकणे किंवा वितरित करणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

“सर्व आरोपी सध्या आमच्या कोठडीत आहेत. आम्‍ही आता या अॅपच्या युजर्सनी भरलेले पैसे कोणत्या अकाऊंटमध्ये जमा झाले आहेत याचा मागोवा घेत आहोत. विशेषत: लोकं या अॅपच्या माध्यमातुन चांगला आर्थिक फायदा मिळवत आहेत. याशिवाय या अॅपमध्ये महिलांना अश्लील व्हिडीओ शूट करण्यात बळजबरी केली जाते का? याचाही तपास आम्ही घेत आहोत, ” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बलुचिस्तानचं नवं चलन 'बलोची फालूस' नेमकं काय? भारताच्या १००० रुपयांचे किती होतील?

'तू भारतासाठी भरपूर केलंस...'; गौतम गंभीरचा 'हिटमॅन' रोहित शर्माला मॅसेज, India vs England मालिका शेवटची? नेमकं काय घडलं?

आदेश बांदेकर तुमच्याही घरी येऊ शकतात! झी मराठीच्या 'होम मिनिस्टर'मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं? फक्त एक गोष्ट

Latest Marathi News Update : पावसाबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज, नेमका कधी परतणार? वाचा...

KashiVishwanath-BHU : काशी विश्वनाथ धामचा परिणाम! BHU मध्ये पर्यटन शिक्षणासाठी नवे केंद्र, पदवी ते PhD पर्यंत अभ्यासक्रम

SCROLL FOR NEXT