Tiger Shroff  Esakal
मनोरंजन

Tiger Shroff Video: महाभारतात हनुमान? टायगरच्या उत्तरानं नेटकरी शॉक

सध्या पौराणिक कथांवर आधारित अनेक चित्रपट रिलिज होत आहेत. त्यातच टायगरला कोणत्या सुपरहिरोची भूमिका साकारायला आवडेल असं त्याला विचारण्यात आलं होतं. मात्र त्याच्या उत्तराने सर्वांना थक्क केलं आहे.

Vaishali Patil

Tiger Shroff Video: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हिरोपंती मधुन हिरो बनुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या टायगरनं काही काळात बॉलिवूडध्ये वेगळी ओळख निर्माण केली. तो त्याच्या फिटनेस, डान्स आणि अॅक्शन सीनमुळे प्रसिद्ध आहे. तो चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन करतो.

टायगर त्याच्या फिटनेसची विषेश काळजी घेतो. तो जास्त चर्चेत किंवा कोणत्याही वादात अडकत नसतो. त्याचा सामावेश कामाशी काम ठेवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये येतो. मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगानं व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. टायगरचा हा व्हिडिओ बराच जूना आहे. सध्या पौराणिक कथांवर आधारित अनेक चित्रपट रिलिज होत आहेत. त्यातच टायगरला कोणत्या सुपरहिरोची भूमिका साकारायला आवडेल असं त्याला विचारण्यात आलं होतं. मात्र त्याच्या उत्तराने सर्वांना थक्क केलं आहे.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जेव्हा टायगलला कोणत्या सुपरहिरोची भूमिका करायला आवडेल किंवा 'क्रिश' सारख्या बॉलिवूड सुपरहिरो असलेल्या चित्रपटात त्याला काम करायचं आहे असं विचारल्यावर तो म्हणला की, 'बॉलीवूडमध्ये कधी महाभारत बनले तर मला हनुमान किंवा रामची भूमिका करायला आवडेल.'

सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी टायगरला ट्रोल करत आहेत तर काहींना त्याला पाठिंबा देखील दिला आहे. एकानं लिहिलं की, ' टागरने कदाचित रीलमध्ये महाभारत पाहिले आहे.' तर काहींना आदिपुरुषची आठवण झाली आहे. 'एकानं लिहिलयं, 'ते बॉलिवूडवाले लोक आहेत ते काहीही करु शकतात.'

तर काहींना कमेंट मध्ये महाभारतात हनूमान होते याचा दाखला दिला आहे. एकानं लिहिलयं की, 'महाभारतात हनुमानजी आहेत... भीमचा अहंकार तोडण्यासाठी वानराच्या रूपात... कृष्णाजींनी त्यांना अर्जुनाच्या रथावर बसण्याची विनंती केली होती.' अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट त्याच्या पोस्टला येत आहेत.

टायगरचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2017 मधला आहे. त्यावेळी टायगर 'स्पायडरमॅन : होमकमिंग'चे प्रमोशन करत होता. या मार्वल चित्रपटात त्याने स्पायडर मॅनसाठी आवाज दिला.


टायगरने 'हिरोपंती', 'मुन्ना मायकल' आणि 'बागी'मध्ये एकत्र काम केले आहे. टायगर श्रॉफ अक्षय कुमारसोबत 'गणपत' आणि नंतर 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT