Tina Datta and Shalin Bhanot  Sakal
मनोरंजन

Bigg Boss 16: शालीनची ‘बिग बॉस’च्या घरात टीनाला शिवीगाळ, व्हिडीओ झाला व्हायरल

शालिन आणि टीना या दोघांकडेच ‘फॅमिली वीक’मध्येही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. बिग बॉस 16 च्या घरात शालीन व टीनाच्या आईने प्रवेश केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 चे स्पर्धक शालिन भानोत आणि टीना दत्ता त्यांच्या गोड नात्यासाठी लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. शालिन आणि टीना या दोघांकडेच ‘फॅमिली वीक’मध्येही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. बिग बॉस 16 च्या घरात शालीन व टीनाच्या आईने प्रवेश केला आहे.

तसेच शालीनचं प्रेम खोटं असल्याचं आईने टीनाला सांगितले आहे. तर टीनालाही शालीनच्या आईने टोमणे मारले आहेत. दरम्यान आता एक नवा वाद समोर आला आहे. युजर्सनी अभिनेत्री टीनाला शालीनने शिवीगाळ करताना पकडले आहे.

हा सगळा प्रकार तेव्हा घडला जेव्हा शालीन स्वयंपाक घरात उभा असताना चिकनवरुन वाद सुरू होतो. वादानंतर, शिव ठाकरेशी बोलत असताना शालीनने टीनाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शोमध्ये शालीनला शिवीगाळ करताना पाहून यूजर्सनी त्याला फटकारले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवीगाळीचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनाही संताप अनावर झाला आहे. शालिन भानोतला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात येत आहे.

शिवीगाळ करतानाचा शालीनचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक भडकले आहेत. “टीनाला शालीनने शिवीगाळ केली आहे. शालीन म्हणतो मी टीनावर प्रेम करत होतो. प्रेम फक्त टिनानेच केले आहे.” असे एका युजरने लिहिले आहे. तसेच बऱ्याच लोकांनी कमेंट करत शालीनच्या वर्तनाबाबत नकारात्मक कमेंट केल्या देखील आहेत.

शालिन आणि टीनाचे नाते हे सध्या सुरू असलेल्या रिअॅलिटी शोचे प्रमुख आकर्षण आहे. शालीनच्या भावनांशी खेळण्यासाठी अभिनेत्रीला सुरुवातीच्या काही महिन्यांत वापरकर्त्यांनी घेरले होते. बिग बॉसची कहाणी आता कुठे वळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या आठवड्यात स्पर्धकांचे कुटुंबीय सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहेत. आत्तापर्यंत प्रेक्षकांनी शिव, स्टेन, शालिन आणि टीनाच्या आईला घरात प्रवेश करताना पाहिले आहे. साजिदची बहीण फराह खानने शोमध्ये प्रवेश केला आणि तिने शोमधील सर्व स्पर्धकांवर प्रेमाचा वर्षाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT