Tu Chal Pudh marathi serial new twist ashwini starts new journey with her mrs india award sakal
मनोरंजन

Tu Chal Pudh: 'तू चाल पुढं' मालिकेत मोठा ट्विस्ट; आश्विनीचा नवा प्रवास.. थेट मिसेस इंडिया!

अश्विनीचं आयुष्य बदलणार.. मालिका रंजक वळणावर..

सकाळ डिजिटल टीम

Tu Chal Pudh: झी मराठीवरील 'तू चाल पुढं' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे. मालिकेत सध्या अश्विनीनं घरातील सगळ्यांचा विरोध पत्करून मोठ्या हिंमतीनं तिचं ब्युटी पार्लर सुरू केलं आहे.

अनेक संकटांना तोंड देत अश्विनीने स्वतःचं विश्व निर्माण केले आहे.आता अश्विनीच्या भूमिकेत लवकरच एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अश्विनी लवकरच मेकओव्हर करणार असून ती पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे.

(Tu Chal Pudh marathi serial new twist ashwini starts new journey with her mrs india award)

हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

'तू चाल पुढं' ही मालिकेतील सगळ्यांची आवडती अश्विनी वाघमारे आता आपल्या स्वप्नांना पूर्ण करताना दिसणार आहे. स्वतःच ब्युटी पार्लर सुरू केल्यानंतर आता अश्विनी उतरणार आहे सौंदर्य स्पर्धेत.

पूर्वी घरात साडी आणि पारंपारिक पोशाख घालणाऱ्या अश्विनीपुढे कोणतेही ध्येय नव्हते. तिला जगासमोर येण्याची भीती वाटत होती. चूल आणि मूल या पलिकडे तिचं काही जग नव्हतं . पण आता ती अधिक ग्लॅमरस आणि आत्मविश्वासाने दिसणार आहे.

अश्विनी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेणार आहे आणि तिच्या सकारात्मक वृत्तीने इतरांना स्पर्धा देईल. आगामी रविवार विशेष महा एपिसोड तू चाल पुडा या मालिकेतून १ तास प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे.

अश्विनी वाघमारे उतरणार आहे सौंदर्य स्पर्धेत. हा शो शोच्या कथानकातही नवा ट्विस्ट आणणार आहे. अश्विनी सौंदर्य स्पर्धेत कशी भाग घेणार? अश्विनी नव्या रुपात कशी आली? हे कळल्यानंतर तिच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय असेल? प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.

पण अश्विनी आता मिसेस इंडिया होणार हे नक्की.. त्यामुळे तिला विरोध करणारी नणंद शिल्पी आणि नवरा श्रेयस आता काय करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

Nagpur News: विदर्भाच्या ‘कॅलिफोर्निया’त उष्णतेचा तडाखा; आंबिया बहराला गळती : संत्री-मोसंबी उत्पादन घटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT