Tunisha Sharma Esakal
मनोरंजन

Tunisha Sharma: हे लव्ह जिहादचं प्रकरण निघालं तर...भाजप नेते राम कदम यांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मनोरंजन विश्वात तुनिषा शर्माच्या आत्महत्येने खळबळ उडली आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तिनं इतक टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलिस करत आहे. तिच्या आत्महत्येला चोविस तासही पुर्ण झाले नसले तरी तिच्या आत्महत्येबाबत नवनवीन खूलासे होतं आहेत.

तुनिषाच्या आत्महत्येचं मोठं कारण हा तिचा खास मित्र आणि सहअभिनेता शीझान खान सांगितलं जात आहे. तुनिषा आणि शीझान हे रिलेशनमध्ये होते आणि काही दिवसांपुर्वीच त्याचं ब्रेकअप झालं होतं. शीझानवर नाराज झाल्यानेच तुनिषाने आत्महत्या केल्याचं अभिनेत्रीच्या आईने म्हंटलं आहे. आता भाजप नेते राम कदम यांनी तुनिषा च्या आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात भाजप नेते राम कदम म्हणाले की लव्ह जिहादचे प्रकरण बाहेर आले तर चौकशी होईल.

आता भाजप नेते राम कदम यांनी तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी अभिनेत्रीच्या आत्महत्येवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल आणि जर हे लव्ह जिहादचे प्रकरण असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि त्यामागे कोणत्या संघटना आहेत आणि कोणी षड्यंत्र रचले आहेत हे शोधून काढले जाईल. याचीही चौकशी केली जाईल.

दरम्यान 2016 मध्ये शीजाननं सिलसिला प्यारमध्ये काम केलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये त्यानं चंद्र चांदनी या नाटकात काम केलं. 2018 मध्ये पृथ्वी वल्लभमध्ये त्यानं प्रिन्स कार्तिकेयची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो अलीबाबा दास्तान ए काबूलमध्ये तुनिशा शर्मासोबत लीड रोलमध्ये दिसून आला होता. शीजानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुनिशासोबतचे त्याचे भरपूर फोटो आणि व्हिडिओ आहेत. त्यामुळं दोघांची चांगलीच केमिस्ट्री जमत असल्याचं दिसून येतं. मात्र, तुनिशानं का आत्महत्या केली याचा अद्याप कोणताही उलगडा झालेला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Vaibhav Sooryavanshi: Dhoni आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर आता Vaibhav सूर्यवंशी ऋद्धिमा पाठकचा खळबळजनक खुलासा, Video Viral

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

SCROLL FOR NEXT