मनोरंजन

'तुझा तर घटस्फोट झालाय त्यामुळे तु तुझ्या'... काम्यावर नेटकरी भडकले

आता तिनं मनोरंजन विश्वातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आता तिनं मनोरंजन विश्वातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अशा अभिनेत्री काम्यावर सोशल मीडियातून टीका होताना दिसत आहे. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले आहे. काम्या ही एक पंजाबी अभिनेत्री असून तिची लोकप्रियता मोठी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. अशावेळी तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे ती दुखावली गेली आहे. तिच्या काही वैयक्तिक गोष्टींवरुन तिला नेटकऱ्यांनी अश्लील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

नेटकऱ्य़ांनी तिला प्रतिक्रिया देताना सभ्यतेची पातळी ओलांडली आहे. आपल्या परखड स्वभावासाठी काम्या ओळखली जाते. एखाद्या विषयावर सडेतोडपणे प्रतिक्रिया देणं हे तिचं वैशिष्ट्यही आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी काम्यानं आपल्या पर्सनल लाईफबद्दल एक खुलासा केला आहे. त्यामध्ये तिनं म्हटलं आहे की, जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा लोकांनी मला अश्लील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. वास्तविक लोकांना माझ्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही. केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून त्यांनी ज्या प्रतिक्रिया मला दिल्या त्यांची पातळी खालच्या स्तरावरची असल्याचे तिनं सांगितलं आहे.

नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना मर्यादा ओलांडली होती. काहींनी माझ्या पाच वर्षाच्या मुलीवर देखील प्रतिक्रिया दिला. त्यावरुन मला ट्रोल करण्यात आले होते. सध्या काम्या तिच्या आयुष्यामध्ये समाधानी आणि आनंदी असल्याचे दिसून आले आहे. पहिल्या लग्नामध्ये तिला कौटूंबिक हिंसाचाराला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे तिनं घटस्फोट घेतला. तिनं टीव्ही अभिनेता करण पटेलला डेट केलं. तेव्हा देखील ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. लोकांनी मला तेव्हा तु तर घटस्फोटीत आहेस तेव्हा तु आता तुझ्या मुलीला दूर करशील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. ते ऐकून मला वाईट वाटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT