Urfi Javed Home issue  esakal
मनोरंजन

Urfi Javed : उर्फीला भाड्याने घर मिळेना, हिंदूंसह मुस्लिमांनीही टाळलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः अतरंगी कपड्यांमुळे मागच्या काही दिवसांपासून उर्फी जावेद चर्चेत आलेली आहे. काही लोक तिच्या बाजूने बोलत असले तरी प्रत्यक्षात मात्र तिला रहायला घर मिळत नाहीये. तिनेच याबाबत खंत व्यक्त केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेद हिला कपड्यांवरुन टार्गेट केलं आहे. उर्फी सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे परिधान करते, त्यामुळे सामाजिक स्वाथ्य बिघडत असल्याचं वाघ यांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे उर्फी मात्र काहीच ऐकायला तयार नाही. आपल्याला कपड्यांचं स्वातंत्र्य आहे, असं म्हणत ती पाहिजे तसे कपडे घातल आहे. उलट चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी ट्विट करीत आहे.

हेही वाचाः ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

चित्रा वाघ यांनी या प्रकरणी महिला आयोगावर आक्षेप घेतला. या प्रकरणी सुमोटो दाखल करुन घेण्याची मागणी केली. मात्र महिला आयोगाने हात वर करत ज्याला त्याला कपड्यांचं स्वातंत्र असल्याचं म्हटलं आहे.

यानंतरही चित्रा वाघ शांत राहिल्या नाहीत. त्यांनी उर्फीला एकदा तरी कानाखाली लावण्याची प्रण केलाय. सध्या हे प्रकरण काहीसं शांत झाल्याचं दिसतंय. त्यातच आज उर्फीने एक ट्विट केलंय.

उर्फीचे नेमकं ट्विट काय?

मी जे कपडे परिधान करते त्यामुळे मुस्लीम मला घर देत नाहीत. तर दुसरीकडे मी मुस्लीम असल्यामुळे हिंदू लोक मला घर देत नाहीत. उरलेले लोक मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे घर देत नाहीत. त्यामुळे मला मुंबईत भाड्याने घर मिळणं अवघड झालं आहे.

असं ट्विट करुन उर्फीने मुंबईत घर मिळत नसल्याचं म्हटलंय. उर्फीला घर मिळत नसल्याने नेटकऱ्यांचाही पारा चढलाय. काहींना संताप येतोय, काहींना ही व्यथा आपलीच असल्याचं वाटतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Navi Mumbai Municipal Schemes: प्रशिक्षणानंतर थेट नोकरी देण्याचा प्रयत्न, नवी मुंबई पालिकेचा विविध योजनांचा धमाका

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळेही सोबत, काय झाली चर्चा?

NEET वादावरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही?; मोदी सरकारच्या भूमिकेची Inside Story... 8 प्रमुख कारणे

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

SCROLL FOR NEXT