urfi javed News urfi javed News
मनोरंजन

उर्फीला मेंदू नाही, वादात पडायचे नाही; दिग्दर्शकाने आरोप फेटाळले

आम्ही आधी काम केले आहे आणि सर्व काही चांगले होते

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed News उर्फी जावेदने (Urfi Javed) एका व्यक्तीने ब्लॅकमेल केलाचा आरोप केला होता. त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही केला. तसेच पोलिसांच्या हलगर्जीपणावर उर्फीने नाराजी व्यक्त केली. तिने व्हिडिओ सेक्सची मागणी केलेल्या चॅटचा स्क्रीन शॉटही शेअर केला होता. तिने पोस्टमध्ये त्याचे नाव घेतले आणि पंजाब इंडस्ट्रीमध्ये काम करीत असल्याचे सांगितले होते. आता त्याने उर्फीला उत्तर देत आपली बाजू मांडली आहे.

हा व्यक्ती पंजाबमधील कास्टिंग डायरेक्टर असून, त्याचे नाव ओबेद आफ्रिदी आहे. ओबेदने उर्फीचे आरोप फेटाळून लावले. उर्फीला मेंदू (Brain) नसल्यामुळे वादात पडायचे नाही. उर्फीसोबत यापूर्वी काम केले आहे. पैशांबाबत काही समस्या होती, असे ओबेद आफ्रिदीने सांगितले.

उर्फीने (Urfi Javed) शेअर केलेल्या चॅटच्या स्क्रीनशॉटवर ओबेद म्हणाला, हे बनावट आहे. माझे नाव किंवा नंबर दिसत नाही. मला तिच्याशी वाद घालायचा नाही. कारण तिला मेंदू नाही. मला माझ्या आयुष्यात शांती हवी आहे. आम्ही आधी काम केले आहे आणि सर्व काही चांगले होते. पैशांबाबत काही समस्या होत्या. त्यामुळे तिने हे सर्व सुरू केले आहे. मला आतापर्यंत कोणाकडूनही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही.

याआधी उर्फी जावेदने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, मी गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात पहिली एफआयआर दाखल केली होती. १४ दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. माझा दोन वर्षांपासून छळ केला जात आहे. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रारही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

Shaktipeeth Highway: शक्तिपीठसाठी जबरदस्तीने मोजणीचे राज्यभर पडसाद; परभणीतील महिला शेतकऱ्यांना मारहाण, बाधित शेतकरी संतप्त!

Latest Marathi News Live Update : ठाणे महापालिकेत शिंदेसेना अन् भाजपमध्ये खडाजंगी

'तुझं नशीबच खूप चांगलं आहे गं' म्हणणाऱ्या बायकांना तेजश्री प्रधानने सुनावलं; म्हणाली, 'मी रात्रभर रडले...'

AI Library: विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी! देशातील पहिले 'एआय डिजिटल ग्रंथालय' उघडणार, कुठे आणि कधी होणार सुरू?

SCROLL FOR NEXT