vaalvi marathi movie superhit box office collection SAKAL
मनोरंजन

Vaalvi Movie: वाळवी मालामाल, सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट, कमाईचा आकडा पाहून चक्रावून जाल

वाळवी रिलीज होऊन आता ९ दिवस झाले आहेत.

Devendra Jadhav

'वाळवी' या मराठी सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. सस्पेन्स थ्रिलर अशी या सिनेमाची ओळख आहे. सध्या वाळवी सिनेमाची जोरात घोडदौड सुरु आहे. सिनेमा रिलीज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली आहे. त्यामुळे हटके कथा असलेला वाळवी प्रेक्षकांना आवडत आहे.

वाळवी रिलीज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. वाळवीने ९ दिवसांमध्ये अडीच कोटींचा टप्पा पार केलाय. पहिल्या आठवड्यात वाळवीने दीड कोटींचा टप्पा ओलांडला होता. आणि पुढील दिवसांमध्ये अंदाजे दीड लाखांची कमाई केली. त्यामुळे वाळवी सध्या २.५४ कोटींवर असून लवकरच वाळवी ३ कोटींच्या घरात जाईल. बॉलिवूडचे प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी सुद्धा वाळवी चं कौतुक केलंय.

शुक्रवारी २० जानेवारीला सिनेमा लव्हर डे होता. यानिमित्ताने सिनेमाचं तिकीट ९९ रुपये होतं. या सिनेमा लव्हर डे निमित्ताने वाळवी पाहायला प्रेक्षकांनी गर्दी केली. वाळवी अनेक ठिकाणी हाऊसफुल गर्दीत पाहण्यात आला. त्यामुळे 'वेड' नंतर 'वाळवी' सुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट झालाय. वाळवी निमित्ताने मराठी सिनेमांची नवीन वर्षाची सुरुवात दमदार झाली आहे.

परेश मोकाशी यांनी वाळवी दिग्दर्शित केला आहे. परेश यांची बायको आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांनी वाळवी सिनेमा लिहिला आहे. सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे असे कलाकार वाळवी सिनेमात आहेत. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झालाय. परेश मोकाशी यांच्या कारकीर्दीत दिग्दर्शक म्हणून आणखी एक हिट सिनेमा जोडला गेलाय.

यापूर्वीच या सिनेमाचे जबरदस्त टिझर आणि ट्रेलर अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. त्यामुळे या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. १३ जानेवारी २०२२ ला वाळवी संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT