vaibhav mangale post on social media after sambhaji bhide controversial statement on mahatma gandhi  SAKAL
मनोरंजन

Vaibhav Mangale: कलावंत व्यक्त झाले तरी बोंब आणि... संभाजी भिंडेंच्या वक्तव्यानंतर वैभव मांगलेंची पोस्ट

अभिनेता वैभव मांगलेने एक वेगळीच पोस्ट करत कलाकार म्हणुन भावना व्यक्त केल्यात.

Devendra Jadhav

Vaibhav Mangle News: सध्या संभाजी भिडेंच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद झालाय. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे सध्या महाराष्ट्रात चांगलाच गदारोळ झालाय.

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती टीका करत आहेत. काल शनिवारी अभिनेता अतुल कुलकर्णीने गांधींबद्दल एक कविता केली होती. अशातच अभिनेता वैभव मांगलेने एक वेगळीच पोस्ट करत कलाकार म्हणुन भावना व्यक्त केल्यात.

(vaibhav mangle post on social media)

काय आहे वैभव मांगलेंची पोस्ट?

वैभव मांगलेंनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मांगले लिहीतात.. कलावंत व्यक्त होत नाही म्हणून बोम्ब व्यक्त झाले तरी बोम्ब…. ज्यांच्या लाभाचे ते कौतूक करणार, नाही ते बदनामी करणार. काय करायचं?

एकुणच संभाजी भिंडेंनी जे आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं त्यावरुन कलाकारांनी व्यक्त व्हावं की होऊ नये, या मुद्द्याला धरुन वैभव मांगलेंनी पोस्ट लिहीलीय.

वैभव मांगलेंच्या पोस्टखाली चाहत्यांच्या कमेंट्स

"बिनधास्त व्यक्त व्हायचं... फक्त सोयीस्कर भूमिका घ्यायची नाही... ठराविक ठिकाणी व्यक्त ठराविक ठिकाणी मौन अशी...."

"बोंबाबोंब झाली तरी प्रत्येकाने व्यक्त होणं गरजेचं आहे मग तो कलाकार असो किंवा सर्व सामान्य माणूस."

"शांत राहायचं, आपल्या ठिकाणी योग्य वेळ सर्व काही बोलून जाईल."

"बदनामी करणे हे काही कलावंतांचे ही आवडते कार्य आहे त्यामुळे .... सत्याचे पाईक निर्भय असावेत."

अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी वैभव मांगलेंतच्या पोस्टवर कमेंट केलीय

काय होतं संभाजी भिडेंचं आक्षेपार्ह्य वक्तव्य?

अमरावतीच्या बडनेर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेलं विधान वादात सापडलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं.

इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा देखील असं संभाजी भिडेंनी केला.

दरम्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भुमिका घेत भिडेंना अटक करण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT