Varun Dhawan's driver dies due to heart attack 
मनोरंजन

वरुण धवनच्या ड्राइव्हरला सेटवर हृदयविकाराचा झटका; प्रयत्नानंतरही वाचू शकले नाही प्राण

गेल्या काही वर्षांपासून मनोज हा वरुणसोबत काम करत होता.

स्वाती वेमूल

अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) ड्राइव्हर मनोज याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. एका ब्रँडच्या शूटिंगसाठी मनोजने वरुणला सेटवर नेलं होतं. मात्र सेटवर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. मनोजला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. लिलावती रुग्णालयाचे डॉक्टर अजय पांडे यांनी मनोजच्या निधनाची बातमी दिली. (Varun Dhawan's driver dies due to heart attack)

एका न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, मनोज हा वरुण धवन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या जवळचा व्यक्ती होता. एका जाहिरातीच्या शूटिंगनिमित्त त्याने वरुणला मेहबूब स्टुडिओला सोडलं होतं. सेटवर पोहोचताच त्याच्या छातीत दुखू लागलं आणि हृदयविकाराचा झटका आला. मनोजच्या निधनाने वरुण आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी वरुणचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मनोजच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेणार असल्याचं सांगितलं.

वरुणनेच रुग्णालयातील सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्या असून त्याच्या टीमने त्यात मदत केली. गेल्या काही वर्षांपासून मनोज हा वरुणसोबत काम करत होता. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. सोशल मीडियावर वरुणसोबतचे मनोजचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये वरुण आणि मनोज यांच्यामधील मैत्री सहज पहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT