Ved marathi movie Box Office collection riteish deshmukh genilia D'souza 
मनोरंजन

Ved Box Office: रितेश-जेनिलिया मालामाल.. 'वेड'नं १३ दिवसात कमावले..

रितेश-जेनिलिया यांच्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसला 'वेड' लागायची बारी आली आहे.

नीलेश अडसूळ

 Ved movie Box Office Collection: सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटाची. मराठी मनोरंजन विश्वात या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने जवळपास सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. सलग 13 दिवस या चित्रपटाने तूफान कमाई केली आहे.

'वेड' हा मराठीतील दमदार कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रितेश आणि जेनिलिया यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री ऑन स्क्रीन ही पाहण्यासाठी चाहते आतुर होते. दोघांचाही फॅनक्लब जबरदस्त मोठा आहे. जेनेलिया चा हा पहिलाच मराठी सिनेमा असल्याने प्रेक्षक अधिकच उत्सुक होते. अखेर ही केमिस्ट्री वर्क झाली असून 'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना 'वेड' लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केलीच. पण सलग 13 दिवस हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांना सिनेगृहांत खेचून आणण्यात 'वेड' यशस्वी झाला आहे. कारण लवकरच हा चित्रपट 50 कोटी कमाईच्या घरात पोहोचणार आहे. सध्या या चित्रपटाने ४० कोटी दहा लाख इतकी केली आहे. त्यामुळे हा आठवडा 50 कोटी पार करणारा असेल, असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT