Waheeda Rehman Esakal
मनोरंजन

Dadasaheb Phalke: ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान ठरल्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी!

Vaishali Patil

Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award: दादासाहेब फाळके पुरस्कार हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. यावेळी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, वहिदा रेहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे.

हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी वहिदा यांची प्रशंसा केली आहे. त्यापैकी प्यासा, कागज के फूल, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, गाईड, खामोशी अशा प्रमुख चित्रपटांचा सामावेश आहे.

5 दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या या कारकिर्दीत, त्यांनी आपल्या भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भुमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त, वहिदा यांनी त्यांच्या कामाप्रती समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे.

ज्या वेळी ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेने संमत केला आहे, त्या वेळी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एका आघाडीच्या स्त्रीचा योग्य सन्मान आहे . चित्रपटाबाहेरच्या जगात त्यांनी आपले जीवन परोपकारासाठी समर्पित केले आहे.

मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्याच्या समृद्ध कार्याला नम्रपणे अभिवादन करतो, जो आमच्या चित्रपट इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे.

वहीदा रहमानने यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्या भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, त्या शेवटच्या स्पोर्ट्स ड्रामा 'स्केटर गर्ल' मध्ये दिसल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT