vicky kaushal in dunki Asoka set visit as a child to starring in Dunki, Vicky with SRK SAKAL
मनोरंजन

Dunki Drop 1: लहानपणी 'अशोका'च्या सेटवर फॅन ते आज 'डंकी'मध्ये शाहरुखसोबत भुमिका, विकी कौशलचा थक्क करणारा प्रवास

शाहरुखच्या डंकी सिनेमात विकी कौशल महत्वपुर्ण भुमिकेत झळकत आहे

Devendra Jadhav

Dunki Drop 1 Teaser News: शाहरुख खानच्या डंकी सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. शाहरुख खानच्या डंकीची पहिली झलक बघण्यासाठी चाहते गेल्या अनेक दिवसांपासुन वाट पाहत होते. आज अखेर शाहरुखच्या वाढदिवसाला डंकी सिनेमा रिलीज झालाय.

डंकी सिनेमात शाहरुखसोबत विकी कौशल सुद्धा पाहायला मिळतोय. विकी पहिल्यांदाच डंकी निमित्ताने किंग खानसोबत काम करताना दिसतोय.

अशातच विकीचा एक जुना फोटो व्हायरल होतोय. जेव्हा तो सम्राट अशोका सिनेमाच्या सेटवर बालपणी शाहरुखसोबत दिसला होता. काय होता तो किस्सा. जाणुन घ्या.

(vicky kaushal in dunki Asoka set visit as a child to starring in Dunki, Vicky with SRK)

विकीचा शाहरुखसोबतचा जुना फोटो व्हायरल

माणसाचं नशीब त्याला कुठवर घेऊन जाईल काही सांगता यायचं नाही. विकी कौशलच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट खरी ठरलीय. लहानपणी शाहरुखचा फॅन म्हणुन फोटो काढणाऱ्या विकीला पुढे शाहरुखसोबत सिनेमात काम करायला मिळेल याची कल्पनाही नसेल.

विकीचे बाबा प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल यांनी विकीचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात मुंबईत सम्राट अशोक सिनेमाच्या शुटींगदरम्यान विकी शाहरुखसोबत फोटो काढताना दिसतोय. त्यानंतर आज विकी शाहरुखसोबत थेट डंकीमध्ये काम करताना दिसतोय.

विकी आणि शाहरुख एकत्र

राजकुमार हिरानींसोबत विकीने संजू सिनेमात अभिनय केला होता. आता विकी राजकुमार हिरानींसोबत पुन्हा एकदा डंकी निमित्ताने काम करतोय. यावेळी खास गोष्ट ती म्हणजे शाहरुख खान.

लहानपणी सम्राट अशोका सिनेमाच्या सेटवर विकीने फॅन म्हणुन शाहरुखसोबत फोटो काढला होता. आज हाच विकी शाहरुखसोबत एकाच सिनेमात अभिनय करतोय. सर्वांना या गोष्टीचा आनंद आहे.

डंकी सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज

विकी कौशलचा सॅम बहादूर सिनेमा २ डिसेंबर २०२३ ला रिलीज होतेय. डिसेंबरमध्ये काहीच दिवसांनी म्हणजेच २१ डिसेंबरला विकीचा शाहरुखसोबत असलेला डंकी सिनेमा रिलीज होतोय.

विकीच्या दोन्हा सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. डंकीमध्ये शाहरुख - विकीशिवाय तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT