Vighnesh Shivan's upcoming project LIC in controversy, insurance company sends notice SAKAL
मनोरंजन

Vighnesh Shivan LIC: विघ्नेश शिवनचा आगामी प्रोजेक्ट वादात अडकला, विमा कंपनीने पाठवली नोटीस

निर्माते विघ्नेश शिवन यांचा प्रोजेक्ट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे

Devendra Jadhav

Vighnesh Shivan LIC Controversy News: चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन यांचा चित्रपट LIC (लव्ह इन्शुरन्स कॉर्पोरेशन) ला विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून शीर्षक वापरल्याबद्दल नोटीस मिळाली आहे.

नुकत्याच आलेल्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विघ्नेश शिवन यांचा LIC प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

नाव बदलण्याची नोटीस मिळाली

अहवालानुसार नोटीसमध्ये म्हटले आहे की, विमा कंपनीने चित्रपटाच्या टीमच्या नावाला विरोध केलाय. पुढील सात दिवसांत निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव न बदलल्यास त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या तरी विघ्नेश आणि टीमने या अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या चित्रपटात हे स्टार्स दिसणार आहेत

लव्ह इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये अभिनेता आणि चित्रपट निर्माते प्रदीप रंगनाथन आणि क्रिती शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एसजे सूर्याही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याची घोषणा करण्यात आली होती. विघ्नेशने मुहर्ताचे फोटो शेअर केले होते.

अनिरुद्धचं दमदार संगीत चित्रपटाला

विग्नेश शिवन, प्रदीप आणि कृती पहिल्यांदाच LIC मध्ये एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सेव्हन स्क्रीन स्टुडिओ आणि राउडी पिक्चर्स करत आहेत.

या चित्रपटाच्या संगीताची धूरा लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर सांभाळणार आहे. यापूर्वी अनिरुद्धने शिवनसोबत काम केले आहे. त्याचबरोबर सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रविवर्मन यांच्याकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT