vir das and ekta kapoor wins international emmy awards 2023 SAKAL
मनोरंजन

Emmy Awards 2023: आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, वीर दास, एकता कपूरने पटकावला पुरस्कार

एमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय कलाकारांनी बाजी मारलेली दिसून येतेय

Devendra Jadhav

यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राजामौलींच्या RRR सिनेमाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर नाव कोरलं. याशिवाय द एलिफंट व्हिस्पर्स सिनेमाला सुद्धा ऑस्कर पुरस्कार पटकावला

सध्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांची घोषणा झालीय. या पुरस्कार सोहळ्यात सुद्धा भारतीय कलाकारांनी बाजी मारलेली दिसून येतेय.

वीर दासने पटकावल मानाचा एमी

इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्सच्या अधिकृत सोशल मीडिया पेजने ही आनंदाची बातमी शेअर केली. नेटफ्लिक्स निर्मित "वीर दास: लँडिंग" स्टँड अप कॉमेडीला गेलाय जातो. डेरी गर्ल्स सीझन 3 आणि वीर दासच्या लँडींगला हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय.

या नेटफ्लिक्स स्पेशलमध्ये, वीर दासने भारतीय आणि अमेरिकन संस्कृतींना राजकारणाच्या दृष्टीकोनातून पाहिलंय. भारतात जन्मलेला माणूस जो अमेरिकेत वाढला होता, वीरच्या दृष्टीकोनातून या दोन्ही संस्कृती शून्यात अस्तित्वात नाही. या दोन्ही संस्कृती असल्याच तर त्यांचा एकमेकांचा संबंध आहे.

एकता कपूरलाही मिळाला पुरस्कार

टेलिव्हिजन क्षेत्रातील यशस्वी योगदानाबद्दल एकता कपूरला एमी पुरस्कार मिळाला आहे. जेव्हा एकताला ऑगस्टमध्ये नामांकनाची बातमी मिळाली होती तेव्हा तिने शेअर केले होते, "एमी पुरस्काराचं माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. जो कामाच्या पलीकडे असलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने जागतिक स्तरावर मी भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. टेलिव्हिजनमध्ये केलेल्या कामगिरीची जागतिक मंचावर दखल घेतली जात आहे."

शेफाली शाह यांचा पुरस्कार हुकला, जीम सरभ वर लक्ष

शेफाली शाह यांना दिल्ली क्राईम या वेबसिरीजसाठी एमीमध्ये नामांकन मिळालं होतं. पण त्यांना पुरस्कारावर नाव कोरता आलं नाही. याशिवाय अभिनेता जीम सरभला रॉकेट बॉईज वेबसिरीजसाठी एमी नामांकन मिळालंय. आता जीमला पुरस्कार मिळणार का? हे पाहायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT