virat kohli, vamika  Esakal
मनोरंजन

Virat Kohli: बाप-लेकीची लंच डेट; वामिका आणि विराटचा लंडनमधील फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Virat Kohli: विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विराट हा मुलगी वामिकासोबत लंच करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Virat Kohli: अभिनेत्री अनुष्का शर्मा (Virat Kohli) आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चिमुकल्याचं आगमन झालं. अनुष्कानं लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. विराट आणि अनुष्कानं त्यांच्या मुलाचं नाव अकाय कोहली असं ठेवलं आहे. अशताच आता विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विराट हा मुलगी वामिकासोबत लंच करताना दिसत आहे.

बाप आणि लेकीची लंच डेट

विराट आणि वामिका यांचा लंडनमधील रेस्टॉरंटमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो वामिकासोबत लंच करताना दिसत आहे. या बाप आणि लेकीच्या लंच डेटच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

विराट आणि वामिकाच्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या.एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "किंग विथ प्रिंसेस" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "वामिका खूप क्युट आहे."

विरुष्कानं दिली गोड बातमी

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी 15 फेब्रुवारीला मुलाचे आगमन झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं,"सर्वांना सांगताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या मुलाचे आणि वामिकाच्या धाकट्या भावाचे या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर क्षणी आम्हाला फक्त तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा पाहिजे आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया यावेळी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा."

अनुष्काचा आगामी चित्रपट

अनुष्का लवकरच चकदा एक्सप्रेस या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काच्या या चित्रपटाची लोक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT