Watch :Shah Rukh Khan is shirtless in latest ad, fans call it 'so cute'. Google
मनोरंजन

५५ वर्षांचा शाहरुख झाला शर्टलेस, १८ वर्षांच्या पोराला लाजवेल अशी बॉडी

इन्स्टाग्रामवर शाहरुखचा एक व्हिडीओ सध्या भलताच पसंत केला जातोय. ही एका कंपनीसाठी त्यानं केलेली बॉडीवॉशची जाहिरात आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा किंग शाहरुखनं(Shah Rukh Khan) पुन्हा एकदा आपल्या व्हिडीओनं(Video) चाहत्यांना थक्क करुन सोडलं आहे. इन्स्टाग्रामवर शाहरुखचा एक कमर्शिअल व्हिडीओ सध्या भलताच पसंत केला जातोय. त्याचे चाहते हा व्हिडीओ पाहून खूपच खूश झालेयत. त्या व्हिडीओत शाहरुख खान बाथरुममध्ये शर्टलेस(Shirtless) दिसत आहे. बॉडीवॉशची जाहिरात करताना शाहरुखनं यातून आपल्या फिटनेसची झलक सुद्धा दाखवली आहे. व्हिडीओची सुरुवात शाहरुखच्या आंघोळीपासून करण्यात आली आहे. जिथे बाथरुमध्ये बॉडीवॉशच्या नावावर शाहरुखच्या हातात एक छोटं पाऊच दिलं आहे.(Watch :Shah Rukh Khan is shirtless in latest ad, fans call it 'so cute')

ते छोटं पाऊच पाहून शाहरुख हैराण झालेला दिसतो. व्हिडीओ पोस्ट करताना गोदरेज मॅजिकनं कॅप्शन लिहिलं आहे की,''भारताचा पहिला रेडी-टू-मिक्स बॉडीवॉश,शाहरुख खान सादर करीत आहे''. व्हिडीओनं इंटरनेटवर नुसता धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओवर किंग खानच्या चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे,'शाहरुख नेहमीच तरुण दिसतो'. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की,'वाह,शाहरुख,खुप मस्त फिटनेस,आणि चांगलं सादरीकरण. आम्हा सगळ्यांना तुझी ही खास झलक दाखवल्याबद्दल धन्यवाद'.

शाहरुख सध्या त्याच्या आगामी 'जवान' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दक्षिणेचा मोठा दिग्दर्शक एटलीच्या या सिनेमाविषयी सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. लवकरच शाहरुखच्या 'पठाण' सिनेमाच्या प्रमोशलाही वेग येईल. या सिनेमात त्याच्या सोबत दीपिका पदूकोणही आहे. तीन-चार वर्षानंतर शाहरुखला पडद्यावर पहायला त्याचे चाहतेही उत्सुक आहेत. शाहरुखने गेल्याच महिन्यात आपल्या फिल्मी कारकिर्दीची ३० वर्ष सेलिब्रेट केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT