Who Is Youtuber Oye Indori Esakal
मनोरंजन

Who Is Youtuber Oye Indori: एकीसोबत लिव्ह इन अन् दुसरीसोबत उरकला साखरपूडा! बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला 'ओये इंदोरी' तरी कोण?

रॉबिन जिंदाल याच्याविरुद्ध लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vaishali Patil

Who Is Youtuber Oye Indori: सोशल मीडियावर ओय इंदोरी या नावाने प्रसिद्ध असलेला रॉबिन अग्रवाल सध्या अडचणीत आला आहे. रॉबिनवर लग्नाचे अमीष देत बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका तरुणीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला असल्याचे बोलले जात आहे.

रॉबिन हा लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रिटींपैकी एक आहेत. त्याचे 74 लाख फॉलोअर्स आहेत. एमआयजी पोलिस स्टेशनचे एसआय सचिन आर्य यांनी सांगितले की, महालक्ष्मी नगर येथील मिथिलेश अग्रवाल यांचा मुलगा रॉबिन जिंदाल याच्याविरुद्ध लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने रॉबिनवर आरोप केला आहे की रॉबिनने लग्नाच्या बहाण्याने तिचे शारीरिक शोषण केले होते. या गंभीर आरोपानंतर रॉबिन सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 35 वर्षीय घटस्फोटित महिलेने याआधी मार्चमध्ये YouTuber विरोधात तक्रार दाखल केली होती. ती एका खाजगी कंपनीत काम करते. तक्रारीनंतर रॉबिनने तिला लग्नासाठी होकार दिला मात्र नंतर त्याने नकार दिला. महिलेने इंदूरमधील एमआयजी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस आता रॉबिनचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

कोण आहे रॉबिन अग्रवाल

रॉबिन हा इंदूरचा रहिवासी आहे. रॉबिनला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. रॉबिन एक प्रसिद्ध YouTuber आहे. सोशल मीडियावर तो खूप सक्रिय असतो. त्याचे इंस्टाग्रामवर 7.4 मिलियन अधिक फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवर सुमारे 80 लाख subscriber आहेत. तो कॉमेडी व्हिडिओ बनवतो. त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर तो खुप व्हायरल होतात.

त्याने काही काळापूर्वी त्याची गर्लफ्रेंड अलिशा राजपूतसोबत एंगेजमेंट केली होती. ज्याचे फोटो त्याने सोशल मिडियावर शेयर केले होते. यापुर्वी रॉबिन TikTok वर व्हिडिओ बनवायचा. अनेकदा तो प्रँक व्हिडिओ देखील करतो.

रॉबिन 2019 मध्ये कलर्स टीव्ही शो 'खतरा खतरा' मध्ये देखील दिसला होता. रॉबिनने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे प्रसिद्ध कॉमेडियन बनण्याचे स्वप्न आहे. मात्र आता तो अडचणीत आल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT