Virat Kohli Video: Esakal
मनोरंजन

Virat Kohli Video: बायकोचं गाणं वाजताच विराट झाला झिंगाट! भर स्टेडियमध्ये चक्क...

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कालच्या सामन्यादरम्यान इतका आनंदी दिसत होता की तो नाचू लागला.

Vaishali Patil

Ind Vs South Africa: कोलकात्यात झालेल्या मॅचमध्ये भारताने 243 धावांनी दक्षिण अफ्रिकेवर विजय मिळवला. भारताने या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 327 धावांचे लक्ष दिले होते मात्र दक्षिण अफ्रिकेचा संघ 83 धावा करुन ऑल आऊट झाला. या सामान्यात विराट कोहलीने धमाकेदार शतक करत आपल्या चाहत्यांना वाढदिवसाचे गिफ्ट दिले.

यासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडेतील 49 शतकांची बरोबरी केली. विराटने वाढदिवसाच्या दिवशी हा विक्रम केल्याने सोशल मिडियावर फक्त विराटचीच चर्चा आहे.

मात्र याबरोबरच विराट कोहलीचे काही व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. विराटला कालच्या सामन्यादरम्यान इतका आनंदी होता की तो स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकला नाही.

विराटचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो फिल्डिंग करताना डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.

खरंतर, या सामन्यादरम्यान विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माच्या बँड बाजा बारात या चित्रपटातील Aivain Aivain हे गाणे डिजेवर वाजले. तेव्हा विराट या गाण्यावर डान्स करताना दिसला. ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये किंग कोहली या गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसला.

इतकच नाही तर काही वेळानं त्यानं शाहरुख खानची सिग्नेचर स्टेपही केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर कोहली शाहरुखच्या चलैया गाणे गुणगुणताना दिसत आहे.

यानंतर कोहली किंग खानच्या गाण्यावर सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. कोहलीची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे. प्रत्येकजण त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. सध्या नेटकरी या व्हिडिओचा आनंद घेत आहे.

5 नोव्हेंबर हा दिवस विराटसाठी खुपच खास ठरला. विराटने त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला. एकीकडे विराटने सामन्यादरम्यान डान्स करून पत्नी अनुष्काची आठवण काढली, तर दुसरीकडे विराटच्या शतकावर अनुष्कानेही आनंद साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT