Yodha Teaser 
मनोरंजन

Yodha Teaser: हायजॅकर्ससोबत लढणार सिद्धार्थ मल्होत्रा, दिशाचा दमदार अंदाज; 'योद्धा'चा जबरदस्त टीझर रिलीज

Yodha Teaser: 'योद्धा' या टीझरमध्ये ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.

priyanka kulkarni

Yodha Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) आगामी 'योद्धा' (Yodha) या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच चाहते हा चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दहशतवाद्यांसोबत लढणार सिद्धार्थ

'योद्धा' या चित्रपटाच्या टीझरमध्ये सिद्धार्थ जबरदस्त ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. तो फायटिंग करताना दिसत आहे. 'योद्धा' या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात विमानाच्या हायजॅकने होते. जिथे सिद्धार्थ मल्होत्रा ​​कमांडोच्या रूपात धडाकेबाज स्टाईलमध्ये एन्ट्री करतो. एकीकडे 'योद्धा' या चित्रपटाच्या टीझरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​दहशतवाद्यांसोबत लढताना करताना दिसत आहे. तर दिशा पटानी एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसत आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर चाहते आता चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'योद्धा' हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राशिवाय दिशा पटानी आणि राशी खन्ना यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती हीरो यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी केली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर योधा चित्रपट ही धर्मा प्रॉडक्शनची पहिली एरियल ॲक्शन फ्रँचायझी आहे.

सिद्धार्थचे चित्रपट

'स्टुडन्ट ऑफ द इयर' या चित्रपटातून सिद्धार्थनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच त्यानं हसी तो फसी, एक व्हिलन, कपूर अँड सन्स या चित्रपटात काम केलं आहे. शेरशाह या चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना गिअर निकामी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

SCROLL FOR NEXT