Teacher esakal
मराठवाडा

ZP School : दोनशे विद्यार्थ्यांचा भार फक्त चार शिक्षकांवर

पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील जिल्हा परिषद शाळेत दोनशे विद्यार्थ्यांचा भार फक्त चार शिक्षकांवर असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘पीरबावडा - पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील जिल्हा परिषद शाळेत दोनशे विद्यार्थ्यांचा भार फक्त चार शिक्षकांवर असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १९८ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांसाठी फक्त चार शिक्षक कार्यरत असून, इयत्ता सहावी व सातवी वर्गातील ८२ विद्यार्थी असून, यांना शिकविण्यासाठी एका शिक्षिकेची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

आंदोलन करण्याचा पालकांचा इशारा

या शाळेतील एक शिक्षक निवडणूक कामासाठी सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात आहे, तर एक शिक्षिका अर्जित रजेवर गेल्या आहेत; तसेच एक शिक्षिका दोन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, निवडणूक कामासाठी पाठविलेल्या शिक्षकास तत्काळ शाळेत न पाठविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

या शाळेतील एक शिक्षक हे निवडणूक कामी गेलेले असून, शालेय समितीने पत्र दिल्यावर आमच्याकडून संबंधित विभागाला शिक्षक सोडण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येईल.

- राजेश महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी

येथील शाळेत दोन दिवसांत शिक्षकाची व्यवस्था न केल्यास, निवडणूककामी पाठविलेला शिक्षक हजर न झाल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात येईल.

- डॉ. सारंग गाडेकर, सरपंच पीरबावडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT