parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani News : बैलाला लागते चक्क फिल्टरचे पाणी ; पाणीबैलाची कथा

फिल्टरच्या पाण्याशिवाय पीत नाही पाणीबैलाची कथा आहे हसू नका कोणीधर्मापुरी शिवारात नखरेवाला बैलबळीराजा करतोय खिसा रोज सैलआजकाल कुणालाही फिल्टर केलेले पाणीच हवे असेत.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : फिल्टरच्या पाण्याशिवाय पीत नाही पाणीबैलाची कथा आहे हसू नका कोणीधर्मापुरी शिवारात नखरेवाला बैलबळीराजा करतोय खिसा रोज सैलआजकाल कुणालाही फिल्टर केलेले पाणीच हवे असेत. लग्न समारंभ असो की कोणती पार्टी फिल्टर केलेले पाणीच मागविले जाते. परंतु, चक्क एका बैलाला फिल्टरचे पाणी दररोज लागते असे म्हटले तर सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसल्या शिवाय राहणार नाही. धर्मापुरी (ता.परभणी) शिवारातील पुंडलीकराव पवार यांच्या शेतातील होंड्या नावाच्या बैलाला दररोज चक्क फिल्टरचे पाणी लागते. या बैलाची ही सवय जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे.

परभणी तालुक्यातील धर्मापूरी गाव शिवारातील पुंडलिकराव पवार यांच्या होंड्या नावाच्या बैलाला चक्क फिल्टरचे पाणी पिण्यासाठी लागते. मुळचे वझूर (ता.परभणी) येथील रहिवाशी असलेले पुंडलीकराव पवार यांचे धर्मापूरी शिवारात ११ एकर शेती आहे. या शेतात सध्या कापूस व ज्वारीचे पिक आहे. पुंडलीकराव पवार व त्यांचे नातेवाईक बाळासाहेब पवार हे या शेतीची मशागत करतात. यांच्या सोबत दोन बैल आहेत.

त्यापैकी एक बैल होंड्या नावाचा आहे. खरे तर जन्मल्यापासून तो त्यांच्या जवळ आहे. सध्या त्याचे वय पाच वर्षाचे आहे. परंतू या बैलाला अगदी लहानपणापासून शुध्द पाण्याची सवय जडली आहे. त्यामुळे आज त्याला दिवसाकाठी पाण्याचे दोन जार लागतात. आमचा होंड्या नावाचा बैल लहानपणापासून आमच्या जवळ आहे. भरपूर काम करतो. त्याचा कोणताही त्रास आम्हाला नाही. केवळ त्याला जारचे स्वच्छ पाणीच पिण्यासाठी लागते. जारमधून टाकले तर तो पाणी पितो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT