Osmanabad Osmanabad
मराठवाडा

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात चार भाविक जागीच ठार

मालेगाव येथील 18 भाविक दर्शनासाठी एका ट्रॅव्हल मधून तिरुपतीला निघाले होते

सयाजी शेळके

तेरखेडा (उस्मानााबाद): तिरुपती दर्शनाला निघालेल्या मालेगाव येथील भाविकांवर काळाने घाला घातला असून चार जण जागीच ठार झाले असून अन्य तीनजण जखमी झाले आहेत. औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर येरमाळच्या जवळ (ता. कळंब) शुक्रवारी (ता. २३) पहाटे दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

मालेगाव येथील 18 भाविक दर्शनासाठी एका ट्रॅव्हल मधून तिरुपतीला निघाले होते. शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल येरमाळा नाजिक आली असता पंक्चर झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने गाडी बाजूला घेतली. रस्त्याच्या बाजूला घेऊन पंचर काढण्याचे काम सुरू होते. याच वेळी काहीजण ट्रॅव्हल मध्ये बसलेले होते. तर उर्वरित काहीजण ट्रॅव्हलच्या बाहेर थांबले होते. मागून आलेल्या आयशर टेम्पोने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की आयशर टेम्पो शेतामध्ये जाऊन पडला. तसेच ट्रॅव्हल ही रस्त्यापासून दूर अंतरावर फेकली गेली.

ट्रॅव्हल (एम. एच. ४१ ए. यु. १५५४) ही मालेगाव कडून तिरुपतीकडे निघाली होती. आयशर टेम्पो ( एम. एच. २०- इ. जी. ५१७०) टेम्पो चालक फरार झाला आहे. मृतांमध्ये शरद विठ्ठलराव देवरे, विलास महादू बचाव, जगदीश दरेकर, सतीश सूर्यवंशी ( सर्व मालेगाव ) यांचा समावेश आहे. तर जखमी संजय बाजीराव सावंत, भारत ग्यानदेव पगार, गोकुळ हिरामण शेवाळे यांना उस्मानाबाद येथे पुढील उपपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT