Latur Accident News 
मराठवाडा

Latur Accident News : औसा-निलंगा मार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार

विश्वनाथ गुंजोटे

किल्लारी : नातेवाईकांच्या परिवारातील मुलाचे पुणे येथे लग्न समारंभ संपन्न करून गावी परतत असताना सकाळी लातूर गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावर चलबुर्गा पाटी ( ता. औसा जिल्हा लातूर ) जवळ अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाखाली पलटी होऊन पडले आहे.

निलंगा (जिल्हा लातूर) येथील नातेवाईकांच्या मुलाचे पुण्याला लग्न समारंभ आटोपून निघालेले नातेवाईक लामजण्यापासून जवळच असलेल्या चलबुर्गा पाटी येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एम एच 24 ए एफ 7050 हे वाहन पुलाखाली पलटी झाले.

यात अंश किरण बडुरकर ( वय 10 ), जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर ( वय 15) , आणि प्रकाश कांबळे ( 27 ), यांचा जागीच मृत्यू झाला. तर जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले असून त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

अपघातात गोदावरी सचिन बडुरकर आणि जान्हवी सचिन बडुरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लग्नानंतर नवरा नवरी आणि वऱ्हाडी दोन वाहनाने गावी ( निलंगा) निघाले होते. यातील नवरा नवरी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. यातील गोदावरी सचिन बडुरकर आणि जान्हवी सचिन बडुरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, किल्लारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे, बीट जमादार सचिन ऊस्तुर्गे, बीट जमादार आर. बी. साळुंखे,  दत्ता गायकवाड, आबा इंगळे, यांनी पाहणी केली.

चलबुर्गा अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून उर्वरित गंभीर जखमींना लातूरला पाठवण्यात आले आहे.

- डॉ. रणदिवे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, औसा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

SSC Result: दहावीच्या निकालाचीच ‘परीक्षा’; राज्य मंडळाला मिळेना मुहूर्त, ‘सीबीएसई’पेक्षा विद्यार्थी कमी असूनही विलंब!

SCROLL FOR NEXT