Aditi Tatkare  sakal
मराठवाडा

Aditi Tatkare : गंगापूर तालुक्यातील भगिनींसाठी एक टक्का जास्त काम करणार- आदिती तटकरे

राज्यमंत्री आदिती तटकरे : गंगापुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

बाळासाहेब लोणे

गंगापूर : महिलांच्या आर्थिक साक्षमीकरणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवत आहोत. महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.

तुम्ही फक्त हाक द्या माझ्या मतदार संघापेक्षाही गंगापूर तालुक्यातील भगिनींसाठी एक टक्का जास्त काम करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केले. शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर आयोजित सार्वजनिक दुर्गामाता नवरात्र

उत्सव समितीतर्फे आयोजित सिनेतारका अर्चना सावंत प्रस्तुत लावण्यांचा कार्यक्रम झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील,

आमदार सतीश चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे, महिला कार्याध्यक्षा वैशाली साबळे, तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, शहराध्यक्ष फैसल चाऊस, युवकचे मराठवाडा अध्यक्ष दत्ता भांगे, जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, मराठवाडा युवतीच्या अध्यक्षा अंकिता विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्सव समितीच्या अध्यक्षा सुवर्णा जाधव यांनी प्रास्ताविक केले.

पुढे बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, निवडून येतात त्यांची नागरिकांच्या समस्या सोडवीण्याची जवाबदारीच असते. पण जे निवडून न येता देखील जनतेशी बांधिलकी जपतात त्यांना जनता कधीही विसरत नाही.

जाधव दांपत्याने शहरात सामाजिक बांधिलकी जपली असल्यानेच नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून शहरवासीयांशी कनेक्ट राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष अंबिलवादे, तुकाराम सटाले, माजी नगरसेवक सुरेश नेमाडे, योगेश पाटील, सोपान देशमुख, दिनेश गायकवाड, गोरख इंगळे, शरद दारुंटे, मंगेश देशमुख, बाबासाहेब लगड, कृष्णा पाटील, अर्जुन कराले, बाळू जाधव, अमोल बुरकुल, विशाल पाटील, भगवान काळे, मयूर जेउघाले, ओम कान्हे, अजय शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT