फोटो 
मराठवाडा

परराज्यातील बनावट घातक मद्यासह दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विनापरवानगी परराज्यातील कमी दर्जाचे मद्य उच्च कंपनीच्या बाटलीत भरुन बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी आलेला मद्याचा साठा उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. यावेळी या पथकाने दोघांना अटक करून मद्य वाहतुक करणारी कारसुद्धा जप्त केली. ही कारवाई बारड (ता. मुदखेड) परिसरात शुक्रवारी (ता. सात) करण्यात आली.

येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दुय्यम निरीक्षक वाय. एस. लोळे यांना कळविले. श्री. लोळे यांनी आपल्या पथकासह दिलेल्या माहितीनुसार मुदखेड ते बारड रस्त्यावर सापळा लावला. शुक्रवारी (ता. सात) सायंकाळच्या सुमारास या रस्त्यावरून चारचाकी वाहन (एमएच२९-आर-५९९९) आले. यावेळी पथकानी हे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकांनी आपले वाहन सुसाट वेगाने पळविली. 

मध्यप्रदेशची बनावट घातक दारु

पथकाला संशय आल्याने त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. अखेर त्या वाहनाला मुदखेड शिवारातील एका धाब्याजवळ पकडले. वाहन चालक प्रकाश माणिकलाल अवस्थी आणि त्याचा साथीदार व्यंकटी बालाजी पवार यांना ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यात विनापरवानगी मध्यप्रदेश राज्याची बनावट दारुचा मुद्देमाल जप्त केला. विदेशी मद्य बनावट बुच लावून उच्च प्रतीचे आहे असे दाखवून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ते वाहतुक करीत होते. जवळपास १८० मिली क्षमतेच्या ४८० बॉटल्या व ७५० मिली क्षमतेचे सात बॉक्स मॅकडॉल जप्त केली.

पथकात यांनी घेतले परिश्रम

पथकांनी या दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून वरिल मुद्देमाल व कार असा चार लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमध्ये निरीक्षक एस. एस. खंडेराय, वाय. एस. लोळे, भगवान मंडलवार, एल. बी. माटेकर,  एस. के. वाघमारे, आशालता कदम, बालाजी पवार, विकास नागमवाड, दिलीप नारखेडे यांचा सहभाग होता. पुढील तपास श्री. लोळे करत आहेत. पथकाचे अधीक्षक निलेश सांगडे यांनी कौतुक केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT