औरंगाबाद 
मराठवाडा

आता मुख्य रस्त्यावरच हेल्मेट सक्ती 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - गल्लीबोळांत, अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारकांना हेल्मेट आवश्‍यकच आहे असे नाही; मात्र मुख्य रस्त्यांवर हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देणार असल्याचे प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी (ता. 27) सांगितले. 

औरंगाबाद शहरात एक फेब्रुवारी 2015 पासून हेल्मेटसक्तीची चोख अंमलबजावणी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकाळात सुरू झाली. यानंतर नागरिकांत मोठा रोष निर्माण झाला होता. प्रंचड विरोधानंतरही पोलिसांनी ठोस कारवाया केल्या.

त्यामुळे हेल्मेट परिधान करणे शहरवासीयांच्या अंगवळणी पडले आहे; परंतु बहुतांशवेळा वाहतूक पोलिस केवळ हेल्मेटबाबतच कारवाया करतात. त्यातून नागरिक व पोलिस यांच्यात वाद होतात. विशेष मोहीम राबवून पोलिस गल्लीबोळांतही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करतात. ही बाबही प्रभारी पोलिस आयुक्‍त भारंबे यांनी हेरली.

यावर त्यांनी ठोस भूमिका घेत गल्लीबोळांत हेल्मेटसक्‍तीची गरज नसावी. तेथे कारवाई न करता वाहतूक नियमनाकडे अधिक लक्ष द्यावे. महामार्गावर, मुख्य रस्त्यांवर हेल्मेट नसेल तर अवश्‍य कारवाई करावी, अशी भूमिका मांडली आहे. याबाबत ते पोलिस अधिकाऱ्यांनाही सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियाकडून तेल खरेदी, तरीही टॅरिफ नाही! ट्रम्प यांचा भारताला मोठा दिलासा

Mira-Bhayandar: मिरा-भाईंदर महापालिकेत भाजप नगरसेवकांचा राडा, पत्रकारांना बेदम मारहाण; Video Viral

Who Is Deepa Bhati : तीन मुलांची आई, वयाच्या ४० व्या वर्षी यूपी पीसीएसमध्ये यश; लग्नानंतर १८ वर्षांनी दीपा भाटी बनल्या अधिकारी

Hasan Mushrif On Gokul Election : 'गोकुळ'च्या राजकारणात नवा ट्विस्ट! मुख्यमंत्र्यांच्या हातात असणार अध्यक्षपदाची सूत्रे, मंत्री हसन मुश्रीफांनी काय केलं जाहीर?

Equal Pay Demand: समान काम, समान वेतन द्या...न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

SCROLL FOR NEXT