rain in marathwada 
मराठवाडा

मराठवाड्यातील 170 मंडळात अतिवृष्टी

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात शनिवारी दुपारनंतर सर्वत्र रिमझिम-मुसळदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने मराठवाड्यात अतिवृष्टीचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असुन रविवारी (ता.२०) सकाळपर्यंत ४२१ पैकी १७० मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. 

यंदा चांगला व वेळेवर पाऊस पडणार, असा हवामान खात्याने एप्रिल- मे महिन्यातच अंदाज व्यक्त केल्याने बळीराजाने वेळीच मशागत केली. जूनमध्ये पाऊस पडताच पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर अधुन- मधून हजेरी लाऊन पाऊस गायब झाला होता. त्यामुळे मराठवाडयातील पिके करपुन गेली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या बैलपोळाच्या पूर्वसंध्येला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शनिवारपासून रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मराठवाडयातील १५६ मंडळात ५० ते ७५ टक्यापर्यंत पाऊस झाला आहे. तर १९६ मंडळात ७५ टक्याहुन अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, मोठे, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा वाढ होण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.

नांदेड, परभणी, हिंगोलीत रिमझिम
नांदेड - नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यात शनिवारी प्रदीर्घ विश्रातीनंतर पावसाचे पुनरागमन झाले. काही ठिकाणची पिके तग धरून असल्याने त्या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. पण हलक्या बरडी जमीन असलेल्या शेतातील पिके वाळली आहेत. रब्बी हंगामासाठी हा पाऊस वरदान ठरेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT