Sambhaji Nagar Crime  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : कंत्राटदाराला १ कोटी १५ लाखांचा घातला गंडा

भागीदारीत रस्त्यांच्या कामाची निविदा भरण्याचे आमिष दाखवत अनामत रक्कम भरण्याचे सांगत शहरातील एका कंत्राटदाराला एकाने तब्बल १ कोटी १५ लाखांचा गंडा घातला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : भागीदारीत रस्त्यांच्या कामाची निविदा भरण्याचे आमिष दाखवत अनामत रक्कम भरण्याचे सांगत शहरातील एका कंत्राटदाराला एकाने तब्बल १ कोटी १५ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार एप्रिल २०२२ दरम्यान घडला. या प्रकरणी तेलंगणाच्या कंत्राटदाराविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विवेक विठ्ठल गवई (५३, रा. पीरबाजार, उस्मानपुरा) यांनी फिर्याद दिली. ते कंत्राटदार असून रस्ते, छोटे पूल यांची कामे करतात. २०१९ मध्ये त्यांची ओळख हैदराबादेतील सृष्टी कन्सटेक प्रा.लि. येथील व्यवस्थापकीय संचालक जे. राजशेखर रेड्डी यांच्याशी झाली. एप्रिल-मे २०२२ मध्ये रेड्डीने आसाममध्ये श्रीरामपूर ते ढोबरी या रस्त्याची निविदा निघाली असून, ३९४ कोटींचे हे काम असल्याचे सांगितले.

माझ्या कंपनीचे मोठे नाव झाले असून, या कंपनीच्या नावे निविदा भरूयात असे सांगितले. त्यासाठी अनामत रक्कम म्हणून एक कोटी ३५ लाख रुपये भरावयचे आहेत, असे सांगत फिर्यादी गवई यांच्याकडून ऑनलाइनद्वारे स्वतःच्या खात्यावर पैसे मागवून घेतले. त्यानंतर ना निविदा मिळाली, ना पैसे. फिर्यादीने अनेकवेळा आरोपी रेड्डीशी संपर्क करत पैसे परत मागितले, परंतु त्यांना पैसे परत मिळाले नाही.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादीने उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठत रेड्डीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, रेड्डीने दोन टप्प्यांत आजवर केवळ २० लाख रुपये फिर्यादीला परत केले. उर्वरित एक कोटी १५ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT