Sambhaji Nagar Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : जनसंपर्क अधिकारी महिलेने केला ३४ लाखांचा अपहार ; ग्राहकांकडून कागदपत्रे मागवून घ्यायची कर्ज

कर्ज प्रक्रियेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे ग्राहकांकडून घेऊन कर्ज प्रस्ताव सादर करीत परस्पर कर्ज उचलून घेणाऱ्या महिलेला जवाहरनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. ९) अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कर्ज प्रक्रियेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे ग्राहकांकडून घेऊन कर्ज प्रस्ताव सादर करीत परस्पर कर्ज उचलून घेणाऱ्या महिलेला जवाहरनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. ९) अटक केली. स्वप्नरेखा भानुदास चौधरी (३३, रा. एन-२, रामनगर) असे अटक झालेल्या महिलेचे नाव असून सुरेखा ढोरे, कविता राठोड, पुष्पा साळवे यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नरेखा चौधरीने बँकेतील ७२ ग्राहकांच्या नावावर कर्ज दाखवून ते परस्पर उचलून घेत ३४ लाख ६० हजारांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. स्वप्नरेखा ही बँकेत ग्राहक जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहात असे. ग्राहकांना कर्जाबाबत विचारणा करत कर्ज हवे असणाऱ्या ग्राहकांकडून सर्व कागदपत्रे घेऊन कर्ज प्रस्ताव सादर करीत असे.

मात्र, तो नामंजूर झाल्याचे ग्राहकांना सांगून स्वत:च त्याच्या नावे कर्जाची रक्कम उचलून घ्यायची. यासाठी तिने ग्राहकांच्या मोबाइल नंबरऐवजी सहकाऱ्यांचे व तिच्या नातेवाइकांचे मोबाईल नंबर दिलेले असल्याने, ग्राहकांना बँकेचे मेसेज मिळत नसे; तसेच बँकेने पाठविलेला ओटीपी नंबर ती नातेवाइकांकडून मिळवून ते पैसे काढून घ्यायची, अशा पद्धतीने तिने ७२ ग्राहकांच्या नावे परस्पर कर्ज उचलून घेतले. दरम्यान, स्वप्नरेखा चौधरी हिला अटक केली असून, तिला सहकार्य करणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

असा उघडकीस आला प्रकार

बँकेच्या ग्राहक काजल राठोड व अनिता चव्हाण यांनी कर्ज घेतलेले नसतानाही त्याच्या सी बिल रिपोर्टमध्ये ४५ हजार रुपये कर्ज असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांनी बँकेकडे तक्रार केली. त्यानंतर तब्बल ७२ ग्राहकांच्या नावे परस्पर कर्ज उचलून अपहार केल्याचे समोर आल्यानंतर बँकेचे विजिलन्स मॅनेजर राजेश जाधव यांनी जवाहरनगर पोलिसात केलेल्या तक्रारीनंतर स्वप्नरेखाचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT