Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : आश्रमशाळेत ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा ; दुधातून विषबाधा झाल्याची घटना

तीसगाव (ता. खुलताबाद) येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ९६ विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (ता. १३) सकाळी घडली. या बाधित सर्व विद्यार्थ्यांना उपचारार्थ वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ वृत्तसेवा

खुलताबाद : तीसगाव (ता. खुलताबाद) येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ९६ विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (ता. १३) सकाळी घडली. या बाधित सर्व विद्यार्थ्यांना उपचारार्थ वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

खुलताबाद तालुक्यातील तीसगाव येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा असून, येथे ३१७ विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. या शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दूध देण्यात आले. ते प्राशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, जुलाब व उलट्या यांसारखा त्रास जाणवू लागला.

पाहता-पाहता ही संख्या ९० च्या पुढे गेली. शिक्षकांनी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६९ विद्यार्थ्यांना तर खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात २७ विद्यार्थ्यांना दाखल केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, या घटनेबाबत वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे मुख्याध्यापक विलास कटारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, नागपूर-बंगळुरू विमानाचे उड्डाण वेळेवर रद्द, प्रवाशांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Australia A Squad: 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'आधी ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय;३५ वर्षीय खेळाडूला दिले भारत दौऱ्याचे तिकीट!

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

SCROLL FOR NEXT