Crime News Esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar: 'दुर्दैवी! खेळता खेळता लिफ्ट चालू केली अन्..' 14 वर्षीच्या मुलाचं शीर झालं धडावेगळं

नववीत शिकणाऱ्या या मुलाचे आई वडील हैदराबादला गेल्याने तो घरी एकटाच होता

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कटकट गेट परिसरातील हॉस्पिटलच्या जवळ 14 वर्षीय मुलाचे लिफ्टमध्ये डोके अडकून मृत्यू झाला आहे. नववीत शिकणाऱ्या या मुलाचे आई वडील हैदराबादला गेले होते. तो एकटाच घरी होता.

तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना त्याने लिफ्टच्या बाहेर डोके काढले. लगेचच लिफ्ट सुरू होताच त्याचे शीर शरीरापासून वेगळं झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साकिब इरफान सिद्दीकी (वय 14 वर्षे) असं मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकिबचे वडील इरफान हे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयात काम करतात. त्यांचे मुख्य कार्यालय हैदराबाद याठिकाणी आहे. कामानिमित्त त्याचे आई-वडील हैदराबादला गेले होते. साकिबला आई वडिलांनी त्याच्या आजी- आजोबाकडे ठेवले होते.

रात्री तो लिफ्टमध्ये खेळत होता. त्याने खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली आणि मुंडके बाहेर काढले. तोच, त्याचे मुंडके धडावेगळे झाले. त्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. त्याला मदत करण्याचीही संधी कोणाला मिळाली नाही. दरम्यान, रात्री उशिराला जिन्सी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT