Sambhaji Nagar Mahanagarpalika  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Mahanagarpalika : ढोल वाजवून महापालिका करणार मालमत्ता जप्त

थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यात दिलेली २१ दिवसांची मुदत संपल्याने सोमवारपासून (ता. १२) संबंधित मालमत्तेसमोर ढोल वाजवून मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेने ३५० कोटी रुपयांचे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट ठरविले होते. त्यानुसार आतापर्यंत १०० कोटींचा आकडा पार केला आहे. उर्वरित काळात जास्तीत-जास्त वसुली करण्यासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार याद्या तयार करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, मात्र थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना शेवटची जप्तीच्या नोटीस देऊन २१ दिवसांत कर भरण्याची मुदत देण्यात आली होती. त्यालाही थकबाकीदारांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे संबंधितांच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे उपायुक्त तथा मुख्य कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT