कृषी अवशेष व उसाच्या चोथ्याचा
पशुखाद्य म्हणून वापर करण्यावर भर
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १५ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने सोमवारी कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील विविध ठिकाणी संयुक्त पाहणी केली. कृषी अवशेष व उसाच्या चोथ्यावर प्रक्रिया करून त्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करण्याच्या शक्यतांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
पशुधनासाठी चारा उपलब्धता वाढविणे, कृषी अवशेषांचा योग्य वापर करणे आणि त्यावर प्रक्रिया करून चारा म्हणून त्यांची उपयुक्तता वाढविणे, हा पाहणीचा प्रमुख उद्देश होता. तसेच चारा व पशुखाद्याच्या वाहतुकीवरील निर्बंध आणि विक्रीसंदर्भातील शासन आदेशांच्या अंमलबजावणीबाबत संबंधित घटकांशी चर्चा करण्यात आली. या संयुक्त पाहणी पथकात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहायक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, नायगाव तालुका पशुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. गौतम खिल्लारे आणि कृष्णूर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहायक पशुधन विकास अधिकारी शिवप्रसाद तेनलवार यांचा समावेश होता. दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, कृषी अवशेषांवर प्रक्रिया आणि संबंधित घटकांमधील समन्वय यांवर पशुसंवर्धन विभागाचा भर आहे. या माध्यमातून चारा उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करून पशुधनाचे संगोपन सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.