छत्रपती संभाजीनगर

दिवाळीच्या सुट्यात ‘अमृत दुर्गोत्सव’ सरकारकडुन मिळणार ऑनलाइन प्रमाणपत्र;

CD
दिवाळीच्या सुट्यात ‘अमृत दुर्गोत्सव’ सरकारकडून मिळणार ऑनलाइन प्रमाणपत्र; शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांना सहभागाबाबत ‘अमृत’चे आवाहन -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २० : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास, महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या सुटीत विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी ऐतिहासिक वारशाशी जोडले जावे, गड-किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्यावा तसेच पुढील पिढीमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि संवर्धनाची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि नागरिकांनी आपल्या घरी, शाळेत किंवा परिसरात महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात. प्रतिकृती तयार केल्यानंतर त्यांची छायाचित्रे काढून अमृत दुर्गोत्सवच्या https://www.amrutdurgotsav.com या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करावीत. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सहभागींना सहभागाबद्दल महाराष्ट्र शासनामार्फत ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना सर्जनशीलतेला वाव देण्यासोबतच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक, पालक, विद्यार्थी, युवक मंडळे, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि विविध संघटनांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक कार्यालयातर्फे करण्यात आले. सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांना गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी तसेच छायाचित्रे अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे. गड-किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाविषयी जनजागृती निर्माण होऊन नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा मिळेल, असेही सांगण्यात आले. ---

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : नारायण गडावरील मनोज जरांगेंच्या मेळाव्याला तुफान गर्दी; विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर?

SCROLL FOR NEXT