छत्रपती संभाजीनगर

लातुरात भरणार ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ स्थानिक उद्योजक व उत्पादकांना नवे व्यासपीठ;

CD
लातुरात भरणार ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ स्थानिक उद्योजकांसह उत्पादकांना नवे व्यासपीठ; दीपावलीनिमित्त तीन दिवस चालणार उपक्रम -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २० : स्थानिक उद्योजक व उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने लातूर येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील औसा रस्ता येथील कल्पतरू मंगल कार्यालयात २६ ते २८ ऑक्टोबरला सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील उत्पादक, विक्रेते आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन व थेट विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या प्रदर्शनात कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, कलात्मक वस्तू, ज्वेलरी, विविध हस्तकला व स्वदेशी उत्पादनांचे स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारची उत्पादने एकाच ठिकाणी पाहण्यास व थेट खरेदी करण्याची संधी लातूरकरांना मिळणार आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांची थेट उपलब्धता या त्रिसूत्रीवर ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाची संकल्पना आधारित आहे. या माध्यमातून लघुउद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तसेच नव्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी महत्त्वाची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून लातूरकरांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी व त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

SCROLL FOR NEXT