Aurangabad District Central Co operative Bank 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्हा बँकेतही ‘शिंदेशाही’!

अध्यक्ष, उपाध्यक्ष अब्दुल सत्तार गटाचे

प्रकाश बनकर

औरंगाबाद : गेल्या अनेक दशकापासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पहिल्यांदाच शिवसेनेच्या ताब्यात आली होती. यामुळे बँकेवर भगवा फडकला. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार गटाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बँकेवर आहेत. यासह संदीपान भुमरे गटाचेही संचालक मंडळ आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या बँकेवर आता शिंदे सरकारचे वर्चस्व राहणार आहे.

जिल्हा बँकेत २० संचालक आहेत. यात शिवसेनेचे १० संचालक आहेत. त्यापैकी आमदार अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, देवयाणी डोणगावकर हे तीन सोडल्यास बाकीचे सात संचालक हे आमदार अब्दुल सत्तार आणि भुमरे गटाचे आहेत. तर पाच संचालक भाजपचे आहेत. राष्ट्रवादीचे दोन, कॉंग्रेसचे तीन आणि नितीन पाटील यांच्या गटाचा एक अपक्ष आहे. या बँकेची निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार सत्तार-भुमरे आणि आमदार दानवे यांच्यात चांगलेच बिनसले होते.

अध्यक्ष नितीन पाटील व उपाध्यक्ष अर्जून गाढे यांच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांनी बँक आपल्या ताब्यात ठेवली आहे. यामुळे ज्या-गटात सत्तार तिकडेच बँक राहील अशी सध्याची स्थिती आहे. महाविकास आघाडीत बघितल्यास शिवसेनेचे निष्ठावंत आमदार अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, ॲड देवयानी डोणगावकर यांच्यासह राष्ट्रावादी दोन आणि काँग्रेस तीन असे एकुण आठ संचालकच महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. बँकेतही महाविकास आघाडी अल्पमतात आहे. तर शिंदे गटाचे सात संचालक, भाजपचे चार, एक अपक्ष असे १२ संचालक मंडळ नव्य सरकारच्या बाजूने आहेत. यामुळे जिल्हा बँक सत्तारांच्या माध्यमातून शिंदे गटाच्या ताब्यात राहणार आहे.

जिल्हा बँकेतील पक्षीय बलाबल

  • राष्ट्रवादी-२

  • काँग्रेस-३

  • शिवसेना-१० (सात शिंदे गटाचे)

  • भाजप-४

  • अपक्ष-१(नितीन पाटीलगटाचे)

  • एकूण- २० संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT