Aurangabad latest news four crores development plan Illusion lighting for flyovers roads dividers antiques Google
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad latest News : शहरात तब्बल पावणेचार कोटींचा लखलखाट

उड्डाणपूल, रस्ते, दुभाजक, पुरातन वस्तूंसाठी इल्युजन लायटिंग

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जी-२० परिषदेनिमित्त शहरात जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील रस्ते, चौक, वाहतूक बेटांच्या सुशोभिकरणासह मोठ्या प्रमाणात लायटिंग केले जाणार आहे. त्यासाठी तीन कोटी ३५ लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे काम वाराणसी येथील अमर इलेक्ट्रिकलला देण्यात आले आहे.

भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेच्यानिमित्ताने महिला प्रतिनिधींची औरंगाबादेत बैठक आयोजित केली आहे. परिषदेनिमित्त विविध कामे करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ५० कोटींचा निधी दिला असून, या निधीतून शहरात सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. उड्डाणपूल, प्रमुख रस्ते, दुभाजक, वाहतूक बेट, ऐतिहासिक वास्तूंची रंगरंगोटी केली जात आहे.

त्यासोबतच लाईटींगही केली जाणार आहे. ही लायटिंग कायमस्वरूपी असेल. या कामासाठी तीन कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून विमानतळ ते रामा हॉटेल ते महावीर चौक, महावीर चौक ते दिल्लीगेट, दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंट, हर्सूल टी पाँईट ते जळगाव रोडमार्गे सिडको बसस्थानक अशा प्रमुख मार्गावर रस्ते, दुभाजक, फुटपाथ, रंगरंगोटी, ग्लो-गार्डन, विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

शेवटच्या टप्प्यात विद्युत रोषणाईची कामे केली जाणार आहेत. त्यात काही लायटिंग कायमस्वरूपी असेल तर काही तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार आहे. वाराणसी येथील कंत्राटदाराला हे काम देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या लायटींगमुळे शहराचे रूपच पालटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT