aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

सुन्न करणारी घटना! ...अन् आई आणि मुलाची अंत्ययात्रा एकत्रच निघाली

मुनाफ शेख

आडुळ (औरंगाबाद): मुलगा वारल्याने एकीकडे त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना आईनेही प्राण सोडल्याची ह्रदय द्रावक घटना शनिवारी (ता.२७) रोजी ब्राम्हणगाव (ता.पैठण) येथे घडली आहे. यामुळे गावभर शोककळा पसरली आहे. दुपारी दोन्ही मृतदेहावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हिरालाल खंडु गांगे वय ४० वर्षे, राहणार ब्राम्हणगाव (ता.पैठण) गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने ञस्त होते. त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज शनिवारी (ता.२७) रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचा मृतदेह त्यांचे मुळ गाव ब्राम्हणगाव आणण्यात आले.

एकीकडे त्यांची अंत्ययात्रेची तयारी सुरु असताना त्यांच्या नातेवाईकांनी हिरालाल यांची वृध्द आई सखुबाई खंडु गांगे वय ७० वर्षे यांना तुमचा मुलगा हिरालाल हा वारल्याचे सांगितले. ही बातमी ऐकताच क्षणी या वृध्द आईनेही आपले प्राण सोडले. एकाच घरात आई आणि मुलगा दोन्ही मयत झाल्याने गावात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहेत. हिरालाल गांगे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगा, पत्नी, वडील असा परिवार आहे.

हिरालाल गांगे त्यांचा परंपरागत चर्मकार व्यवसाय करुन कुटुंब- कबिला चालवित होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले असतानाच त्यांचे आईचेदेखील निधन झाल्याने अख्यं गावंच दुख:त बुडाले आहे. या गावात प्रथमच आई आणि मुलाचे एकाच दिवशी निधन झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन

Vasai Accident: शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबला; कारनं ९ जणांना उडवलं; वसईत होळीच्या रात्री थरार

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

Viral Video: आश्चर्यकारक तपश्चर्या! होळीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये तो थेट उतरला… पुढे जे घडलं ते पाहून सगळे थक्क

T20 World Cup: भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार नाही, संजू सॅमसन खेळला म्हणून उपांत्य फेरीत पोहोचले, नाहीतर...

SCROLL FOR NEXT