Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : खासगी वाहतूकदारांची बेशिस्ती संपेचना

पोलिस अन् आरटीओही हतबल : चौकाचौकात वाहतुकीचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अनुषंगाने शासनाने खासगी वाहतूकदारांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळेच बिनधास्त झालेल्या खासगी वाहतूकदारांकडून मनमानी आणि बेशिस्तपणा करण्यात येत असल्याने सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत.

खासगी वाहतूकदारांनी एसटी भाड्यापेक्षा अधिक किंवा मनमानी पद्धतीने भाडे आकारु नये, असे आरटीओ कार्यालय सांगत असले तरीही खासगी वाहतूकदार ऐकण्यास तयार नाहीत. यासंदर्भात ठोस कारवाई केली जात नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आरटीओ आणि पोलिसांकडून काहीशी ढील दिली जात असल्याने खासगी वाहतूकदार गैरफायदा घेऊन मनमानी करीत आहेत. सिडकोच्या वसंतराव नाईक चौक आणि महाविर चौक (बाबा पेट्रोल पंप), हर्सूल टी पॉइंट, चिकलठाणा या ठिकाणी खासगी वाहतूकदारांचा बेशिस्तपणा दिसत आहे. प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, काळीपिवळी, खासगी जीप, मिनीबस, स्कूल बस असा वाहनांचा अक्षरशः धुमाकूळ असल्याचे चित्र आहे.

रस्त्यांच्या मधोमध वाहतूकीचा विचार न करात प्रवाशांच्या हाताला धरून वाहनात बसवण्याची स्पर्धाच या चौकांमध्ये दिवसभर सुरु असते. प्रवाशांकडू मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली जात आहे. मात्र सध्या प्रवाशांना दुसरा पर्याय नसल्याने निमुटपणे अधिक भाडे दिल्याशिवाय प्रवाशांना पर्याय राहिलेला नाही.

पोलिसांच्या साक्षीने प्रकार

चौकाचौकात खाजगी वाहतूकदारांचा अक्षरशः धुमाकूळ सुरु आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक चौकात पोलिस उभे आहेत. तर आरटीओचे पथकही सोयीनुसार चक्कर मारत आहे. असे असतानाही खासगी वाहतूकदार ऐकण्यास तयार नाहीत, चौकांमध्ये रस्त्यावरी दुसऱ्या वाहनांचा आणि वाहतूकीचा विचार न करता वाहने उभी केली जातात. त्यामुळे नागरीक आणि प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT