Aurangabad Thief sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : कारागृहातून बाहेर येताच फोडली चार कार्यालये

सराईत घरफोडी करणारा सकाळी ११ च्या सुमारास चोरीच्या गुन्ह्यातून हर्सूल कारागृहाच्या बाहेर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सराईत घरफोडी करणारा सकाळी ११ च्या सुमारास चोरीच्या गुन्ह्यातून हर्सूल कारागृहाच्या बाहेर आला आणि मध्यरात्रीच चार कार्यालये फोडली. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे या चोरट्याला पोलिसांनी शोधून काढले व बेड्या ठोकल्याची माहिती क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली

रेकॉर्डवरील आरोपी ईश्वर गौडा हा चोरीच्या गुन्ह्यात दोन सप्टेंबर रोजी सकाळी हर्सूल कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने चोरी करण्यासाठी निराला बाजार भागात ‘रेकी’ केली. मध्यरात्री १२ नंतर त्याने आयुष गंगवाल यांचे निराजा बाजार येथील ऑफिस फोडले. तेथून १५ हजार रुपयांचे चांदीचे तीन शिक्के, ७५ हजार रुपये किमतीचे पाच संगणक चाेरले.

त्यानंतर सावन चुडीवाल यांच्या ऑफिस फोडून दोन हजार रुपये रोख, स्वप्निल उपाध्याय यांच्या ऑफिस मधून १५ हजार रुपयांची संगणकाची हार्डडिस्क, डॉ. मुंदडा यांच्या कार्यालयातून दोन पोर्टेबल सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या घटनेच्या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके, तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने केला. सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केल्यानंतर गौडा यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गौडा यास ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली ; तसेच ४४ हजार रुपयांची मुद्देमालही काढून दिला. ही कामगिरी निरीक्षक डॉ. दराडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक खटके, साेनवणे, हवालदार संतोष मुदिराज, नरेंद्र गुजर, इरफान खान, भाऊलाल चव्हाण, संतोष सूर्यवंशी, हनुमंत चाळणेवाड, कृष्णा चौधरी यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT