Aurangabad Vaccination of Animals 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पीपीई किट घालून जनावरांचे लसीकरण

ब्रुसेल्ला लस : जिल्ह्यात आतापर्यंत ९१ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - दुभत्या जनावरांचे ब्रुसेल्ला रोगापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. प्राण्यांपासून मानवाला ब्रुसेल्ला आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात पशुवैद्यकीय डॉक्टर हे पीपीई किट घालून जनावरांना ब्रुसेल्लाची लस देत आहेत. सदरील लस ही ४ ते ८ महिन्यांच्या कालवडींना देण्यात येत आहे.

राष्ट्रीय पशू रोगनियंत्रण कार्यक्रमअंतर्गत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी केवळ रोगाचे लक्षण असणाऱ्या जनावरांना ही लस दिली जात होती. पण यंदा केंद्र सरकारने राष्ट्रीय अभियान म्हणून या लसीकरण मोहिमेची घोषणा केली. त्यानुसार १ ऑगस्टपासून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्यातर्फे जिल्ह्यात या मोहिमेला सुरवात झाली असून ९१ हजार ८०० ब्रुसेल्लाची लस देण्यात आली आहे.

असा होतो आजार

गाय आणि म्हशीमध्ये गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यांत गर्भपात होतो. तसेच गर्भपातानंतर आत मांस वाढून ते कुजण्यास सुरवात होते. यात जनावराचा मृत्यू होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते.

६ लाख जनावरांना डिजिटल नंबर

जिल्ह्यात ६ लाख ५० हजार जनावरे असून यात १ लाख ६९ हजार दुभती जनावरे आहेत. जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार जनावरांना १२ क्रमांक असलेले युनिक आयडेंटिफिकेशन डिजिटल नंबर देण्यात आले आहेत. जनावरांच्या कानावर या नंबरची नोंद असून नव्याने लस दिलेल्या वासरांना देखील हे नंबर दिले जात आहेत.

कच्चे दुधातून मानवाला रोगाची शक्यता

गाय आणि म्हशींमध्ये बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीवांमुळे हा रोग होतो. पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून जनावरांमध्ये हा रोग पसरतो. गाय आणि म्हशीमध्ये गर्भ पिशवी संबंधित हा आजार आहे. रोगग्रस्त दुभत्या जनावराचे कच्चे दूध प्राशन केल्यास तसेच संपर्कात आल्यास हा रोग माणसाला देखील होऊ शकतो.

मानवाला आजार झाल्यास त्याची लक्षणे

  • गुडघे व सांधे दुखणे.

  • वारंवार ताप येणे.

  • वजन कमी होणे.

  • थकवा येणे.

सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात ही लस उपलब्ध करून दिली आहे, पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच लसीकरणासाठी आलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना सहकार्य करावे.

-डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT